"मला हवा तसाच जोडीदार मिळाला", मराठी अभिनेत्री करणार अरेंज मॅरेज; कोण आहे होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:59 IST2025-09-20T14:58:51+5:302025-09-20T14:59:27+5:30
अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

"मला हवा तसाच जोडीदार मिळाला", मराठी अभिनेत्री करणार अरेंज मॅरेज; कोण आहे होणारा नवरा?
मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही साखरपुडा केला. तर इतरही काही टीव्ही कलाकारांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेली मालिका अशोक मा.मा. मधील अभिनेत्री रसिका वाखरकरही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला. रसिकाचा होणारा नवरा कोण? त्यांचं कसं जुळलं याबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
'अल्ट्रा मराठी बझ'ला दिलेल्या मुलाखतीत रसिका वाखरकर म्हणाली, "आमचं अरेंज मॅरेज आहे. खूप लवकर हे सगळं ठरलं. आधी दोन्हीकडचे कुटुंबीय भेटले. मग आम्ही फक्त दोन महिने घेतले त्यात एकमेकांसोबत वेळ घालवला. मग एकमेकांना पसंत केलं."
"माझ्या अपेक्षा याच होत्या की मी ज्या क्षेत्रात काम करतीये त्या प्रोफेशनला समजून घेणारा, आदर करणारा आणि कलेविषयी थोडीफार आवड असणारा हवा अशा पार्टनरच्या मी शोधात होते. फक्त पार्टनरच नाही तर त्याच्या कुटुंबियांनीही माझ्या या प्रोफेशनला पाठिंबा द्यावा अशी माझी अपेक्षा होती. कारण माझ्या कुटुंबाचा कायमच मला पाठिंबा राहिला आहे. तसंच परफेक्ट जोडीदार असं काहीच नसतं. आपणही परफेक्ट नसतोच. ते नातं फुलवायचं आपल्यावर असतं. तो एक प्रवास असतो. तर तो प्रवास मला कोणासोबत शेअर करायला आवडेल अशाच मुलाच्या मी शोधात होते. तर मला तसाच पार्टनर आणि कुटुंबही मिळालं आहे."
होणारा नवरा काय करतो?
"शुभंकर अजिबातच या क्षेत्रातला नाही. मला हेच हवं होतं. मला या क्षेत्रातला जोडीदार नकोच होता. त्यांचा फॅमिली बिझनेस आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत तो काम करतो आणि माझ्या क्षेत्राबद्दल त्याला उत्सुकता आहे. तसंच सासू सासऱ्यांनी माझं काम बघितलं आहे. मी काय करतेय याविषयी त्यांनाही कौतुक असतं. सिनेमा, नाटक बघणं यासाठीही ते हौशी आहेत हेही माझ्यासाठी महत्वाचं आहे."