रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 16:30 IST2023-12-18T16:30:00+5:302023-12-18T16:30:00+5:30
Reshma shinde: रेश्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हे गाणं फूल एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे.

रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील
सोशल मीडियावर दररोज असंख्य गोष्टी ट्रेंड होत असतात. यात बऱ्याचदा काही गाणी ट्रेंड होताना दिसतात. विशेष म्हणजे कलाकार मंडळी सुद्धा हे ट्रेंड उत्तमरित्या फॉलो करतात. गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांमध्ये गुलाबी शरारा हे गाणं तुफान लोकप्रिय होत आहे. अनेकांनी याच्यावर रिल्स सुद्धा शेअर केले आहेत. अलिकडेच या गाण्यावर अभिनेत्री रुपाली भोसले हिने व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता रेश्मा शिंदेने सुद्धा या गाण्यावर हटके व्हिडीओ शेअर केला आहे.
रेश्मा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात अलिकडेच तिने साऊथ इंडियन लूकमध्ये काही फोटो, व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता तिने साध्याच्या लूकमध्ये एक सुरेख व्हिडीओ शेअऱ केला आहे.
रेश्माने सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या गुलाबी शरारा या गाण्यावर भन्नाट रील शेअर केलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तिने दिलेले एक्स्प्रेशन्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, रेश्माच्या या व्हिडीओवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनी सुद्धा कमेंट केल्या आहेत. रेश्माची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत असते. अलिकडेच रेश्मा रंग माझा वेगळा या मालिकेत झळकली होती. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून प्रेक्षक पुन्हा एकदा तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.