​कलर्सच्या तू आशिकी मध्ये राकेश बापट दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 09:09 AM2018-05-03T09:09:59+5:302018-05-03T14:39:59+5:30

तू आशिकी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेचे कथानक दिवसेंदिवस ...

Rakesh Bapat in Colors' Aashiqui role | ​कलर्सच्या तू आशिकी मध्ये राकेश बापट दिसणार या भूमिकेत

​कलर्सच्या तू आशिकी मध्ये राकेश बापट दिसणार या भूमिकेत

googlenewsNext
आशिकी ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेचे कथानक दिवसेंदिवस रंजक होत आहे. या मालिकेच्या कथानकाला आता वेगळे वळण मिळणार असून या मालिकेत एका प्रसिद्ध कलाकाराची लवकरच एंट्री होणार आहे. 
कलर्सची लोकप्रिय ड्रामा मालिका तू आशिकी मध्ये एक नवीन प्रवेश पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता राकेश बापट रेयांश दिवाणची भूमिका साकारताना दिसणार आहे. राकेश बापट मालिकेमध्ये रेयांश दिवाणच्या भूमिकेत दिसणार आहे. रेयांश हा एक उद्योजक आहे आणि संगीताचा प्रेमी आहे. लंडन मध्ये त्याच्या मालकीचे क्लब आहेत. अस्सल बिझनेसमन असून सुद्धा तो प्रेमळ आहे. कथा पुढे सरकत असताना राकेशचे पात्र आहान (ऋत्विक अरोरा) आणि पंक्तिच्या (जन्नत झुबेर) च्या जीवनात नवीन कलाटणी आणि वळणे आणणार आहे.  या भूमिकेविषयी बोलताना राकेश बापट सांगतो, "या मालिकेतील माझी भूमिका खूप चांगली असल्याने मी या मालिकेत काम करण्याचे ठरवले. ही व्यक्तिरेखा मी आजवर साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या प्रेक्षकांचे मी या नव्या छटेतून मनोरंजन करू शकेन. कलर्स आणि निर्माते गुरूदेव भल्ला यांच्या सोबत काम करण्याची मी कित्येक दिवसांपासून वाट पाहात होतो. तसेच पुढेही अशाच प्रकारचा सकारात्मक क्रिएटिव्ह प्रवास एकत्रित करण्याची आशा बाळगत आहे."
मराठमोळा अभिनेता राकेश बापट याने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याचा तुम बिन हा चित्रपट आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. राकेशने तुम बिन या मालिकेनंतर त्यानंतर त्याने दिल विल प्यार व्यार, कोई मेरे दिल में है यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच सात फेरे, एक पॅकेट उम्मीद, होंगे जुदा न हम यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले आहे. त्याने हमारी बहु रजनीकांत या मालिकेत देखील नुकतेच काम केले आहे. 

Also Read : राकेश बापट म्हणतोय चित्रपट करायची ही योग्य वेळा नाही.. का म्हणतोय राकेश असे वाचा..

Web Title: Rakesh Bapat in Colors' Aashiqui role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.