"आई, मी आयुष्यात खरंच...", पूर्वा कौशिकच्या सासूचं निधन; शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:16 IST2024-12-17T09:15:41+5:302024-12-17T09:16:04+5:30
पूर्वाच्या आईवडिलांचं तिच्या लहानपणीच निधन झालं होतं. सासूच्या रुपात तिला पुन्हा आईच मिळाली होती.

"आई, मी आयुष्यात खरंच...", पूर्वा कौशिकच्या सासूचं निधन; शेअर केली भावुक पोस्ट
'शिवा' मालिकेतून सर्वांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva Kaushik). पूर्वाने तिच्या शिवा या भूमिकेमुळे सर्वांचंच मन जिंकलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून तिला पुरस्कार मिळाला होता. तेव्हा पूर्वा तिच्या आईवडिलांच्या आठवणीत भावुक झाली होती. आता नुकतंच तिच्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. पूर्वाच्या सासूचं निधन झालं आहे. तिने भावुक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पूर्वा कौशिकने इन्स्टाग्रामवर सासूचे आणि त्यांच्यासोबतचे तिचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांचं नुकतंच निधन झालं असून पूर्वा खूप भावुक झाली आहे. सासूच्या रुपात तिला पुन्हा आईच मिळाली होती पण आता पुन्हा तिच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हरपलं आहे. पूर्वा लिहिते, "Rest in peace आई, एक नातं जन्माने परिस्थिती ने तयार होतं ते रक्ताच नातं त्याला आपण नातेवाईक नाव देतो.. हे सर्वसामान्य आहेच... पण एखादं नातं हे आपण नैसर्गिकपणे, समजून उमजून सांभाळतो त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात मला कळलंच नाही....
तसच नातं आहे हे आई तुमचं आणि माझं...
खूप मन भरून आलंय डोकं जड झालंय... काय बोलावं काय करावं कळत नाहीये... मग एक जाणवलं तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं आता तर लिहिलं असतं! तर तसच काहीस वाटतंय....आई मी आयुष्यात खरंच खूप काही चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात.... २५शी नंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली.... मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पाहिली ,अनुभवली जी माझी मैत्रीण, आई , सासू ,बहीण सगळं होतं... मी खूप कधी व्यक्त झाले नाहीये ... माणूस अनुभवाने समृद्ध होत जातो असं म्हणतात. मला माझं माणूसपण जपण्यात तुमचीच साथ होती आहे आणि आयुष्यभर असेल... आता ह्या क्षणाला कसं काय कुठून बोलावं तेही कळत नाहीये.... डोळ्यासमोरून ६ वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्स्प्रेस सारखा जातोय .... खुप जास्त heavy feel होतंय... पण तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एकदम छान शांत मनमोकळेपणाने रहा... तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा ... Ice cream Amul च kha... आता अडवायला येणार नाही .. हे खा ते खाऊ नका असं नाही म्हणणार...
तुमच्या माझ्यासोबतच्या आठवणी कायम माझ्यासोबात ठेवणार आहे मी... माणूस म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे... कळत नकळत तुमच्यासारखी होण्याचा असण्याचा प्रयत्न होत असतो.. तो करत राहणार आहे आयुष्भर.... माझ्यासोबत रहा बस..... एवढंच ....
तुमची पूर्वा..
पाच वर्षांपूर्वी पूर्वा कौशिकचं लग्न अमोघ फडकेसोबत झालं. अमोघ हा प्रकाश योजनाकार आहे. त्याला जन्मवारी या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट प्रकाशोजनाकार म्हणून पुरस्कार मिळाला. पूर्वा आणि अमोघ यांचा संसार खूप सुखाचा सुरु आहे.