सईसाठी मुक्ता होणार 'आजीबाई'; प्रेमाची गोष्ट मालिकेत रंजक वळण, प्रोमो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:03 IST2025-03-03T18:00:17+5:302025-03-03T18:03:11+5:30
सईसाठी मुक्ता घेणार नवं रूप, प्रेमाची गोष्ट मालिकेत मोठा ट्विस्ट.

सईसाठी मुक्ता होणार 'आजीबाई'; प्रेमाची गोष्ट मालिकेत रंजक वळण, प्रोमो व्हायरल
Premachi Goshta: 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग सुद्धा प्रचंड मोठा आहे. अभिनेता राज हंचनाळे आणि स्वरदा ठिगळे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या सातत्याने चर्चेत येत आहे. या मालिकेचं कथानक त्यातील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. दरम्यान, या मालिकेत सावनी मुक्ता आणि सागरला त्रास देण्यासाठी कोणत्याही मार्गाला जात आहे. आता तर थेट ती सई आणि आदित्यच्या भावनांसोबत खेळू लागली आहे. आदित्यच्या कस्टडीच्या बदल्यात सई मिळवण्यासाठी सावनी बनावट कागदपत्रांवर सागरच्या सह्या घेते. त्यामुळे ती आता संपूर्ण कोळी कुटुंबाला वेठीस धरते आहे.
नुकताच सोशल मीडियावर प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय की, लाडक्या सईमाऊसाठी मुक्ता वयोवृद्ध महिलेचं रुप धारण करुन मुक्ता सावनीच्या घरी पोहोचली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये मुक्ता पहिल्यांदा सावनीच्या घराची बेल वाजवते. सावनी दरवाजा उघडताच मुक्ता घरामध्ये एन्ट्री घेते.
पुढे प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय घरात गेल्यानंतर मुक्ता सावनी म्हणते," उठली काय गं टवळे?". म्हातारीच्या वेशात असलेल्या मुक्ताला सावनी काही ओळखू शकत नाही. आपल्या घरात या वृद्ध महिलेला पाहून सावनी म्हणते, "कोण आहात तुम्ही ? इथे काय करत आहात?" सावनीच्या प्रश्नाचं उत्तर देत मुक्ता म्हणते," मी हिची केअरटेकर". मी आलीये या पोरीशी खेळायला आणि तुझा खेळ खंडोबा करायला...," मुक्ताचे ते शब्द ऐकून सावनी बिथरते. स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेला प्रेमाची गोष्ट मालिकेचा धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. शिवाय आता मुक्ता सईला पुन्हा घरी कशी घेऊन येणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.