"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं?
By देवेंद्र जाधव | Updated: July 16, 2025 11:07 IST2025-07-16T11:05:52+5:302025-07-16T11:07:22+5:30
अपूर्वा नेमळेकरची नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अपूर्वाने सर्व गोष्टींमधून ब्रेक घेतला आहे. काय आहे यामागील कारण

"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं?
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अलीकडेच 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनीच्या भूमिकेतून अपूर्वा नेमळेकरला खऱ्या अर्थाने खूप प्रसिद्धी मिळाली. अपूर्वा नेमळेकरने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत खलनायिका साकारुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण पुढचे काही दिवस अपूर्वा लोकांशी संपर्क तोडून असणार आहे. काय आहे यामागचं कारण. अपूर्वाने स्वतःच पोस्ट करुन खुलासा केला आहे.
"पुढचे १५ दिवस मी नाही"- अपूर्वा नेमळेकर
अपूर्वा नेमळेकरने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती लिहिते की, "सर्वांना नमस्कार. मी पुढचे १५ दिवस एक मेडिटेशन कोर्स करणार आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी उपलब्ध नसेन. काही क्षणांची विश्रांती पुन्हा परत येण्यासाठी. या काळात मी फोन किंवा सोशल मीडियावर उपलब्ध नसेन", अशी पोस्ट लिहून जर काही ताताडीचं काम असल्यास कोणाशी संपर्क साधता येईल, याचाही खुलासा केला आहे. Disconnecting to reconnect असं कॅप्शन देऊन अपूर्वाने ही पोस्ट शेअर केली आहे.
अपूर्वाचं वर्कफ्रंट
अपूर्वा नेमळेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती नुकतीच आपल्याला 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत दिसली. या मालिकेत सुरुवातीला तेजश्री प्रधान काम करत होती. पण नंतर तेजश्रीने ही मालिका सोडली. अपूर्वाने या मालिकेत सावनीची भूमिका साकारली. याआधी 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंताची व्यक्तिरेखा खूप गाजली. शेवंता आणि अण्णा नाईक यांची विशेष केमिस्ट्री सर्वांना आवडली. आता १५ दिवसांचा मेडिटेशन कोर्स करुन अपूर्वा नवीन प्रोजेक्टची घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे