"पैसे घेतले, दारुची सवय..", प्रत्युषाच्या निधनानंतर ९ वर्षांनी बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:59 IST2025-01-08T18:58:35+5:302025-01-08T18:59:24+5:30

नुकतंच एका मुलाखतीत राहुल सिंहने प्रत्युषाची मैत्रीण आणि अभिनेत्री काम्या पंजाबीवर निशाणा साधला आहे.

pratyusha banerjee case boyfriend rahul raj singh blames kamya punjabi for her drinking habit | "पैसे घेतले, दारुची सवय..", प्रत्युषाच्या निधनानंतर ९ वर्षांनी बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर आरोप

"पैसे घेतले, दारुची सवय..", प्रत्युषाच्या निधनानंतर ९ वर्षांनी बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर आरोप

'बालिका वधू' या गाजलेल्या मालिकेत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने (Pratyusha Banerjee) आनंदी ही मुख्य भूमिका साकारली होती.  तिला या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली होती. मात्र काही वर्षांनी प्रत्युषाच्या आत्महत्येची बातमी आली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता.  या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता राहुल सिंहवरही आरोप झाले होते. त्यानेच प्रत्युषाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप झाला. प्रत्युषाच्या निधनाला ९ वर्ष उलटून गेली आहेत. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत राहुल सिंहने प्रत्युषाची मैत्रीण आणि अभिनेत्री काम्या पंजाबीवर निशाणा साधला आहे.

शुभोजीत घोषला दिलेल्या मुलाखतीत राहुल राज सिंह म्हणाला, "हे सगळं काम्या पंजाबीमुळेच सुरु झालं. तिनेच प्रत्युषाच्या आत्महत्येला हत्या असं वळण दिलं. यानंतर विकास गुप्ता आणि राखी सावंतही तिच्यामुळे तसंच बोलले. प्रत्युषाला मी मारलंय असा दावा अनेक जण करत होते. मी हे सगळं मीडियात बघत होता. तसंच प्रत्युषाने आर्थिक ताणातून आत्महत्या केली कारण तिच्याकडे काम नव्हतं असंही बोललं गेलं. पण विकास गुप्ताने कधीच तिला कामाची ऑफर दिली नाही. पण मीडियासमोर येऊन फक्त बोलायला लागला."

तो पुढे म्हणाला, "मी तर काम्याला ओळखतंही नव्हतो. प्रत्युषाने एका पार्टीत माझी आणि काम्याची ओळख करुन दिली. तेव्हा काम्या पूर्णपणे नशेत होती. प्रत्युषाने काम्याला दोन-अडीच लाख उधार दिले होते. प्रत्युषाने अनेकदा पैशांचा पाठपुरावा केला. पण काम्याने सध्या तिच्याकडे पैसे नाही म्हणत टाळलं. काम्या खूप दारु प्यायची. त्यामुळे प्रत्युषालाही तीच सवय लागली होती. मी अनेकदा प्रत्युषाला इतकं पिऊ नको असं म्हणत टोकायचो. पण मी तिच्या मित्रांसमोर व्हिलन दिसायचो. हे होणारच होतं. पण हे सर्वांनाच माहित आहे की काम्या किती पार्टी करते."

प्रत्युषाने अवघ्या २४ व्या वर्षी टोकाचं पाऊल उचललं. १ एप्रिल २०१६ रोजी तिने आत्महत्या केली. तिच्या पालकांनीच राहुल राज सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती.

Web Title: pratyusha banerjee case boyfriend rahul raj singh blames kamya punjabi for her drinking habit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.