तप्त वाळवंटात प्रार्थना बेहेरे फोटोशूट, लाल गाऊनमधील बोल्ड व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:11 IST2023-12-12T16:10:43+5:302023-12-12T16:11:45+5:30
Prathana Behere: प्रार्थनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तप्त वाळवंटात प्रार्थना बेहेरे फोटोशूट, लाल गाऊनमधील बोल्ड व्हिडिओ व्हायरल
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अखेरची झळकली. त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. मात्र, प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहे.
प्रार्थना सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसत नसली तरीदेखील ती अनेक ब्रँडसाठी फोटोशूट करत असते. त्यामुळे या फोटोशूटमधील काही निवडक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करते. परंतु, यावेळी ती एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. प्रार्थनाने नुकतंच वाळवंटामध्ये लाल रंगांचा डिझायनर गाऊन परिधान करुन एक व्हिडीओ शूट केला आहे.
प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वाळवंटात कडक उन्हात चालत आहे. सोबतच तिने लाल रंगाचा वेस्टर्न गाऊन परिधान केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला करीना कपूरचं 'आ..जानेजा' हे गाणं सुरु आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आणखीनच खास ठरत आहे.
दरम्यान, प्रार्थना बेहरेने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. पवित्र रिश्ता या गाजलेल्या मालिकेत ती झळकली होती. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिस्टर सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.