"तू आधी दूर हो आणि मग बोल!"; जेवणावरुन प्रणित मोरेचा अमाल मलिकसोबत जोरदार राडा, प्रोमो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:36 IST2025-09-15T16:35:50+5:302025-09-15T16:36:22+5:30
मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अमाल मलिकसोबत जोरदार राडा झाला आहे. त्यामुळे घरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे

"तू आधी दूर हो आणि मग बोल!"; जेवणावरुन प्रणित मोरेचा अमाल मलिकसोबत जोरदार राडा, प्रोमो आला समोर
'बिग बॉस १९'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये विविध पार्श्वभूमी असलेले स्पर्धक सहभागी आहेत. अशातच मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी आहे. याशिवाय बॉलिवूडचा गायक अमाल मलिकही 'बिग बॉस १९'मध्ये सहभागी आहे. अमाल आणि प्रणित हे दोघे 'बिग बॉस १९'मध्ये चांगले मित्र. पण आता या दोन मित्रांमध्ये चांगलीच फूट पडणार आहे. कारण जेवणावरुन अमाल आणि प्रणितमध्ये मोठा राडा झाल्याचं दिसतंय.
अमाल आणि प्रणितमध्ये मोठा राडा
'बिग बॉस १९'चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. या प्रोमोत ''जेवण किती वाजता जेवणार?'' यावर घरातील कॅप्टन अमाल मलिक इतर सदस्यांना विचारतो. त्यावेळी प्रत्येकजण रात्री उशीरा जेवण्यास तयार नसतात. त्यामुळे अमाल प्रणितला विचारतो. ''मला उशीरा चालेल, पण बाकीच्यांना लवकर हवं असेल तर मी रेडी आहे'', असं प्रणित अमालला सांगतो. हे ऐकताच ''कधीतरी सपोर्ट कर'', असं अमाल वैतागून प्रणितला म्हणतो. त्यामुळे प्रणितला चांगलाच राग येतो.
प्रणित हीच गोष्ट घरातील इतरांना सांगतो. त्यावेळी अमाल त्याच्याशी भांडायला येतो. ''तू एक गोष्ट धरुन बसतो'' असं म्हणत अमाल प्रणितच्या अंगावर जातो. तेव्हा प्रणित त्याला म्हणतो, ''तू पलटी खातोस. दोन वेळा पलटी खाल्लीस. मी सांगतो काय झालंय ते. पण आधी माझ्यापासून दूर जा आणि मग बोल.'', अशा शब्दात प्रणितने अमालला चांगलंच सुनावलं. अशाप्रकारे प्रणित आणि अमाल या दोन खास मित्रांमध्ये जोरदार राडा झाला. अमालला वाटलं होतं की, प्रणित त्याला सपोर्ट करेल. परंतु मैत्रीपेक्षा घरच्याचं बहुमत प्रणितसाठी महत्वाचं होतं.