Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 09:32 IST2025-11-07T09:30:19+5:302025-11-07T09:32:00+5:30
Pranit More Returns to Bigg Boss 19: तब्येतीच्या कारणास्तव बिग बॉस १९ मधून बाहेर पडलेला प्रणित मोरे आता पुन्हा एकदा घरात दमदार कमबॅक करणार आहे

Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर
Pranit More Re-enters Bigg Boss 19: तब्येतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला 'बिग बॉस १९'मधून बाहेर जावं लागलं. प्रणितला डेंग्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे प्रणित मोरे 'बिग बॉस १९'मध्ये कधी परतणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. पण अखेर प्रणितच्या चाहत्यांनाच नव्हे तर 'बिग बॉस १९'च्या सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का मिळाला आहे. 'बिग बॉस १९'मध्ये प्रणित मोरेची वापसी झाली आहे. ते सुद्धा एकदम खास स्टाईलमध्ये. याविषयीची व्हिडीओ समोर आला आहे.
अशी होणार प्रणितची घरवापसी
शुक्रवारच्या एपिसोडमध्ये प्रणित मोरे घरात पुन्हा प्रवेश करणार आहे. नवीन प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, प्रणित मोरेची एन्ट्री थेट स्टोअर रूममधून होणार आहे. स्टोअर रूमची बेल वाजताच नीलम गिरीला तिथे कोणीतरी लपून बसल्याचा संशय येतो. त्यानंतर अभिषेक बजाज आणि गौरव खन्ना यांना प्रणित परत आल्याचे वाटते. शेवटी, जेव्हा फरहाना भट तिथे जाते, तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. प्रणितला पाहून ती आश्चर्यचकीत होते, तर दुसरीकडे मृदुल धावत जाऊन त्याला आनंदाने मिठी मारतो.
या धमाकेदार एन्ट्रीसोबतच प्रणित मोरे 'द प्रणित मोरे शो' देखील होस्ट करणार आहे. तो पुन्हा एकदा त्याच्या खास शैलीत घरातील सदस्यांची खिल्ली उडवणार असल्याचं बोललं जातंय.
Sabke chehre pe hai khauf, Bigg Boss ke ghar mein kuch toh ajeeb ho raha hai! 😨
— JioHotstar Reality (@HotstarReality) November 6, 2025
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par.
Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyfpic.twitter.com/dtoyrFH0sO
प्रणित मोरेला खास अधिकार
मिळालेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस'ने प्रणित मोरेला त्याच्या कमबॅकसोबतच एक खास अधिकार दिला आहे. या अधिकाराचा वापर करून तो नॉमिनेट झालेल्या एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यापासून वाचवू शकतो. या आठवड्यात गौरव खन्ना, नीलम गिरी, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि अभिषेक बजाज हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. प्रणित त्याच्या या विशेष पॉवरने कोणाला वाचवणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान प्रणितच्या येण्याने मात्र घरातलं वातावरण पुन्हा एकदा आनंदी होणार, यात शंका नाही.