Bigg Boss 19 Grand Finale: हसवेल अन् तितकाच रडवेल! प्रणित मोरेचा 'बिग बॉस'मधला रोमांचक प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:17 IST2025-12-06T15:17:09+5:302025-12-06T15:17:48+5:30
Pranit More Bigg Boss 19 Journey: प्रणित मोरेचा बिग बॉस जर्नी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Bigg Boss 19 Grand Finale: हसवेल अन् तितकाच रडवेल! प्रणित मोरेचा 'बिग बॉस'मधला रोमांचक प्रवास
'बिग बॉस १९'चा उद्या ७ डिसेंबर रोजी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गौरव खन्ना, अमाल मलिका, प्रणित मोरे, फरहाना भट आणि तान्या मित्तल हे पाच स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. आज बिग बॉसकडून सर्वांच्या प्रवासाची झलक दाखवली जात आहे. यामध्ये आपला भाऊ प्रणितचाही संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. प्रणितची खिल्ली उडवणारे, त्याला आव्हान देणारे सगळेच स्पर्धक एक एक करत बाहेर गेले होते. प्रणितचा व्हिडीओ जितका हसवणारा आहे तितकाच भावुक करणाराही आहे.
प्रणित मोरेचा बिग बॉस जर्नी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रणितने या सीझनमध्ये सर्वाना खळखळून हसवलं. सलमानच काय तर येणारे प्रत्येक सेलिब्रिटी पाहुणेही प्रणितला माझ्यावर कोणता जोक केलास असा प्रश्न विचारत होते. घरातील काही सदस्यांनी त्याला रंगावरूनही हिणवलं मात्र त्याने कधी हार मानली नाही. कायम मर्यादेत राहूनच तो हा खेळ खेळला. त्याची चेष्टा करणारे, त्याला आव्हान देणारे स्पर्धक एक एक करुन बाहेर पडले. प्रणितचा हा रोमांचक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओवर मेघा धाडेने कमेंट करत, 'ट्रॉफी आपलीच भावा, जिंकून ये' असे लिहिले आहे. शिवाय अनेक मराठी इन्फ्लुएन्सर्सने स्टोरी शेअर करत प्रणितला वोट करा असं आव्हान केलं आहे. अभिनेत्री आणि बिग बॉस १८ ची स्पर्धक शिल्पा शिरोडकरनेही प्रणितला जाहीर पाठिंबा दिला आहे. आता उद्या ७ डिसेंबर रोजी बिग बॉस १९ चा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.