"कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं...", प्राजक्ताची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले- "तुझं कर्ज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 12:51 IST2024-04-16T12:50:17+5:302024-04-16T12:51:11+5:30

प्राजक्ता सध्या अनेक प्रोजेक्टसाठी काम करत आहे. यासाठी ती मॉडेलशूट आणि ब्रँडच्या जाहिरातीही करत आहे. असाच एक व्हिडिओ तिने इन्स्टावर शेअर केला आहे.

prajakta mali shared video of advertise shoot netizens reacted see comments | "कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं...", प्राजक्ताची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले- "तुझं कर्ज..."

"कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं...", प्राजक्ताची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले- "तुझं कर्ज..."

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा म्हणजे प्राजक्ता माळी. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्राजक्ताने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केल आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या गाजलेल्या शोचं सूत्रसंचालन करून प्राजक्ता प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

अभिनयाबरोबरच प्राजक्ता अनेक कारणांमुळे चर्चेत असते. कलाविश्वातील करिअरबरोबरच प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रगती करत आहे. प्राजक्तप्रभा या पुस्तकानंतर तिने प्राजक्तराज हा तिच्या दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने कर्जतमध्ये प्राजक्तकुंज हे फार्महाऊस खरेदी केल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. यासाठी मोठं कर्ज काढलं असल्याचा खुलासा प्राजक्ताने एका मुलाखतीत केला होता.  आता हे कर्ज फेडण्यासाठी प्राजक्ता प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. 

प्राजक्ता सध्या अनेक प्रोजेक्टसाठी काम करत आहे. यासाठी ती मॉडेलशूट आणि ब्रँडच्या जाहिरातीही करत आहे. असाच एक व्हिडिओ तिने इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडिओत प्राजक्ता जाहिरातींसाठी फोटोशूट करताना दिसत आहे. या व्हिडिओला तिने हटके कॅप्शनही दिलं आहे. "कर्ज फेडायला करावं लागतं बाबा", असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 

"फोटो काढून दमली", "तुमच्यासारखी कर्ज आम्हाला पण होऊ दे आणि तुमच्यासारखी कामं आम्हाला पण मिळू दे", "Tension not प्राजु सगळं होईल कर्ज काय ते तर फिटेलच... तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत असेच देवाला मागेल मी", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. त्याबरोबरच प्राजक्ताच्या लूकवरुनही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.  

Web Title: prajakta mali shared video of advertise shoot netizens reacted see comments