Video: प्रभाकर मोरेंनी गाजवली दुबई; 'शालू'वर केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:32 IST2024-06-06T15:32:28+5:302024-06-06T15:32:53+5:30
Prabhakar more: प्रभाकर मोरे सध्या दुबई दौऱ्यावर असून येथील अपडेट ते चाहत्यांना देत आहेत.

Video: प्रभाकर मोरेंनी गाजवली दुबई; 'शालू'वर केला भन्नाट डान्स
कोकणी शैलीत चपखल विनोद करत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रभाकर मोरे (prabhakar more). आपल्या अभिनयातून आणि विनोद कौशल्याचून त्यांनी कायम कोकणी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांचं शालू हे गाणं तुफान लोकप्रिय झालं. विशेष म्हणजे अनेक अमराठी लोकांमध्ये सुद्धा हे गाणं लोकप्रिय आहे. यामध्येच आता प्रभाकर मोरे यांनी या गाण्यावर दुबई गाजवली आहे.
सध्या प्रभाकर मोरे दुबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे इथले अपडेट्स ते चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. अलिकडेच त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी दुबई दौऱ्यावर असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांनी त्यांचा भन्नाट शालूवरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रभाकर मोरे यांनी 'बुर्ज अल दुबई' या हॉटेलसमोर शालू या त्यांच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विदेशात जाऊनही प्रभाकर मोरे गावच्या मातीला विसरले नाहीत, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.