राया-मंजिरीच्या नात्यात येणार वादळ; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत या लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:45 IST2025-04-09T15:40:32+5:302025-04-09T15:45:40+5:30
'येड लागलं प्रेमाचं' ही छोट्या पड्यावरील लोकप्रिय मालिका आहे.

राया-मंजिरीच्या नात्यात येणार वादळ; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत या लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमो व्हायरल
Yed lagla Premacha: छोट्या पड्यावरील 'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premacha) या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेत अनेक ट्विस्ट आले आहेत. अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची मालिकेमध्ये प्रमुख भूमिका आहे. राया-मंजिरीच्या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसत आहेत. एकंदरीत मालिकेचं कथानक आणि कलाकारांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. आता या लोकप्रिय मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर येड लागलं प्रेमाचं मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रानबाजार फेम अभिनेत्री माधुरी पवारची झलक पाहायला मिळते आहे. या मालिकेत माधुरी निकी नावाच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या प्रोमोमध्ये डॉळ्यांना गॉगल आणि बोटा अंगठी अशा स्टायलिश अंदाजात माधुरी पाहायला मिळतेय. आता मालिकेत निकीची एन्ट्री झाल्याने राया-मंजिरीची मैत्री कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते या भागाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री १० वाजता प्रसारित केली जाते. मालिकेतील हा भाग प्रेक्षकांना शुक्रवारी ११ एप्रिलच्या दिवशी पाहता येणार आहे.
दरम्यान,माधुरी पवारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'देवमाणूस','रानबाजार' या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे.