‘निम्की मुखिया’मध्ये लोकप्रिय कलाकार मोनालिसाचे मादक आयटम गीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 17:55 IST2018-01-06T12:25:00+5:302018-01-06T17:55:00+5:30

‘निम्की मुखिया’मध्ये लोकप्रिय कलाकार मोनालिसाचे मादक आयटम गीत!  ‘निम्की मुखिया’ मालिकेतच सध्या निम्कीच्या बहुप्रतिक्षित आणि भव्य लग्नाची धामधूम उडाली ...

Popular Artist Monalisa 's itemized item song! | ‘निम्की मुखिया’मध्ये लोकप्रिय कलाकार मोनालिसाचे मादक आयटम गीत!

‘निम्की मुखिया’मध्ये लोकप्रिय कलाकार मोनालिसाचे मादक आयटम गीत!

िम्की मुखिया’मध्ये लोकप्रिय कलाकार मोनालिसाचे मादक आयटम गीत!

 ‘निम्की मुखिया’ मालिकेतच सध्या निम्कीच्या बहुप्रतिक्षित आणि भव्य लग्नाची धामधूम उडाली आहे.निम्कीची भूमिका साकारणार्-या भूमिका गुरुंग हिला सध्या स्वर्ग जणू दोन बोटे उरला आहे. हे लग्न अतिशय भव्य प्रमाणावर आणि थाटामाटात पार पाडण्यासाठी निर्मात्यांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.आता निम्की आणि बब्बू सिंह यांच्या लग्नाला एक ग्लॅमरचे वलय लाभावे, यासाठी मोनालिसा ही मादक नर्तिका आपले एक मादक नृत्य निम्कीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात सादर करणार आहे. टॉलीवूडमधली एक विख्यात अभिनेत्री असलेली मोनालिसा ही आपल्या ठुमक्यांसाठी प्रसिध्द आहे. या मालिकेचे कथानक बिहारमध्ये घडत असल्याने मोनालिसाचे नृत्य त्यात अचूक भर टाकेल. ‘आ रे प्रीतम प्यारे’ या गाण्यावर मोनालिसा नृत्य करणार आहे. ती सांगते, “या मालिकेत मी जरी केवळ एका गाण्यापुरतीच सहभागी होणार असले, तरी या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मला या मालिकेच्या टीमकडून आलेला अनुभव अतिशय अप्रतिम होता. यातील सर्व कलाकार हे इतके उत्साही आणि अगत्यशील आहेत! मला यातील माझा पोशाख फारच आवडला, तो या गाण्यासाठीच तयार करण्यात आला होता. माझं नृत्य प्रेक्षकांनाही पसंत पडेल, अशी आशा आहे.”

Also Read:‘निम्की मुखिया’मालिकेतील या कलाकारांनी दिली प्रेमात असल्याची कबुली,एकमेकांसोबत असा घालवतात वेळ!

‘निम्की मुखिया’ मालिकेची नायिका भूमिका गुरुंग सध्या ग्लॅमजगताचा अनुभव घेत असून त्यात तिचे वैयक्तिक जीवनही खाजगी राहात नाही,कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्यात काय काय करतात हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे भूमिकालाही सध्या तिचे चाहते वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक प्रश्न विचारत असतात.सध्या भूमिका गुरूंग एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. भूमिका अभिनेता अमितसिंह सोबतचा हा फोटो आहे.खुद्द भूमिकानेचा हा फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन दिली आहे.भूमिका अमितसिंहच्या प्रेमात पडल्याचे साक्ष तिचे हे फोटो देत असल्याचे पाहायला मिळत आहे. भूमिकाच्या या प्रेमप्रकरणाची सारी माहिती या मालिकेच्या सर्व कर्मचारी आणि कलाकारांनाही आहे. कीथी भूमिकेने अमितसिंह लोकप्रिय आहे.या प्रेमप्रकरणाची भरपूर चर्चा झाल्यावर भूमिकाने आता अधिकृतरीत्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Web Title: Popular Artist Monalisa 's itemized item song!