नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:51 IST2025-12-13T17:50:59+5:302025-12-13T17:51:35+5:30
Pawan Singh : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला धमकी मिळाल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला धमकी मिळाल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या संपूर्ण घटनेत लॉरेन्स बिश्नोई गँगकडून एक ऑडिओ मेसेज जारी करण्यात आला आहे. ऑडिओमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, लॉरेन्स बिश्नोई गँगने पवन सिंह यांना कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही. हा ऑडिओ गँगशी संबंधित गँगस्टर हरि बॉक्सरकडून आला आहे.
ऑडिओ मेसेजमध्ये हरि बॉक्सरने म्हटलं आहे की, पवन सिंहला गँगकडून कोणताही कॉल किंवा धमकी देण्यात आलेली नाही. पवन सिंह कदाचित सुरक्षा मिळवण्यासाठी असा दावा करत असेल. गँगस्टरच्या मते या संपूर्ण प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगला विनाकारण ओढलं जात आहे.
हरि बॉक्सरने पवन सिंहवर आरोप केला की तो त्यांच्याविरुद्ध चुकीचं विधान करत आहेत आणि पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. असं असूनही, गँगकडून कोणतीही धमकी देण्यात आली नाही. लॉरेन्स बिश्नोई गँग जे काही करते, ते उघडपणे करते. ऑडिओमध्ये त्याने हेही म्हटलं आहे की, "जो सलमान खानसोबत काम करेल, त्याला आम्ही धमकी देणार नाही, तर एके-४७ ने गोळ्या घालू."
"सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा मेसेज आला होता. मेसेजमध्ये थेट सांगण्यात आलं होतं की, जे काम तुम्ही करत आहात ते थांबवा आणि सलमान खानसोबत काम करू नका. धमकी मिळाली तेव्हा पवन सिंह मुंबईतच होता आणि तो बिग बॉसच्या फायनलमध्ये सहभागी होणार होता.