तेनालीरामा मालिकेतील पंकज बेरी सांगतायेत, प्रेक्षकांना माझा खलनायकी अंदाजच अधिक आवडतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 16:38 IST2017-07-18T11:08:51+5:302017-07-18T16:38:51+5:30

तेनाली रामा ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तेनाली या अतिशय हुशार व्यक्तीची कथा प्रेक्षकांना या मालिकेद्वारे जाणून ...

Pankaj Beri, in the Tinali Rama series, the audience liked my bad estimation | तेनालीरामा मालिकेतील पंकज बेरी सांगतायेत, प्रेक्षकांना माझा खलनायकी अंदाजच अधिक आवडतो

तेनालीरामा मालिकेतील पंकज बेरी सांगतायेत, प्रेक्षकांना माझा खलनायकी अंदाजच अधिक आवडतो

नाली रामा ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तेनाली या अतिशय हुशार व्यक्तीची कथा प्रेक्षकांना या मालिकेद्वारे जाणून घेता येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना पंकज बेरी एका प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी याआधी महाभारत, पेशवा बाजीराव यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ते आता तेनाली रामा या मालिकेत तथाचार्य ही भूमिका साकारत आहेत. तथाचार्य हे राजा कृष्णदेवराय यांच्या न्यायकक्षेतील शाही पंडित होते. ते अतिशय धुर्त, स्वार्थी आणि तेनाली रामाचे सर्वात मोठे शत्रू होते. त्याला राजाच्या दरबारातून बाहेर काढणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते. ते नेहमीच तेनाली रामाची दिशाभूल करतात. पण तेनाली नेहमीच बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांच्यावर मात करतो. त्यामुळे त्यांचा तेनालीवरचा राग दिवसेंदिवस वाढतच असतो. ही भूमिका साकारण्यासाठी पंकज बेरी खूप उत्सुक आहेत. ते सांगतात, माझ्या पिढीला तेनाली रामा चांगलाच माहीत आहे. या मालिकेमुळे नव्या पिढीला तेनाली रामाविषयी जाणून घेता येणार आहे. तथाचार्य या माझ्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. ही भूमिका खलनायकाची असली तरी ती खूपच वेगळी आहे. मी माध्यमांपेक्षा कधीही भूमिकेला अधिक महत्त्व देतो. त्यामुळे मी नेहमीच चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये काम करण्यास उत्सुक असतो. तथाचार्य ही भूमिका मला भावल्यानेच ही मालिका स्वीकारण्याचा मी विचार केला. मी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याचसोबत मी काही चित्रपट, मालिकांमध्ये सकारात्मक भूमिका देखील साकारली आहे. पण प्रेक्षकांना माझा खलनायकी अंदाजच अधिक आवडतो. त्यामुळे या मालिकेतील माझी भूमिका देखील प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे. 

Also Read : 'या' मालिकेत दिसणार बरखा बिश्त

Web Title: Pankaj Beri, in the Tinali Rama series, the audience liked my bad estimation