आला रे आला...!! आपला लाडका रितेश भाऊ आला.., 'बिग बॉस मराठी ६' लवकरच भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 09:26 IST2025-12-13T09:24:32+5:302025-12-13T09:26:09+5:30
'Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या दमदार सीझननंतर आता सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आला रे आला...!! आपला लाडका रितेश भाऊ आला.., 'बिग बॉस मराठी ६' लवकरच भेटीला
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या दमदार सीझननंतर आता सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाचव्या सीझननंतर आता सहावा सीझन येण्यासाठी खूप मोठा काळ गेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अलिकडेच सहाव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. तो पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन कोण करणार, कोण-कोण स्पर्धक दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान आता या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, त्यातून समजतंय की, सर्वांचा लाडका रितेश भाऊ म्हणजेच रितेश देशमुखच यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत पाहायला मिळतंय की, आला रे असा..असं म्हणत प्रोमोची सुरूवात होते आणि दारात भलीमोठी रांगोळी, दरवाज्याला झेंडूच्या फुलांचं तोरण, ढोल आणि पर्पल रंगाच्या शेरवानीमध्ये पाठमोरा अभिनेता दिसतो आहे. त्यानंतर बिग बॉस मराठी लवकरच असा टेक्स्ट समोर येतो. या व्हिडीओतून समजतंय की, यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन रितेश देशमुखचं करणार आहे. प्रोमो शेअर करत त्यांनी लिहिले की, आला रे आला...!! आपला लाडका रितेश भाऊ आला... घेऊन एकदम लय भारी धमाका... या प्रोमोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
बिग बॉस मराठी ६च्या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, कोण कोण आहेत स्पर्धक? काही संकेत..?
दुसऱ्या युजरने लिहिले की, राडा होणार आता. आणखी एकाने लिहिले की, भाऊ, थँक्यू सो मच. खूप लवकर आलात तुम्ही. तुमची वाट बघत होतो आम्ही. नेटकरी बिग बॉस मराठीचा नवा सीझन कधी सुरू होणार आणि कोण-कोण स्पर्धक पाहायला मिळणार हे कमेंट्समध्ये विचारत आहेत.