रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:36 IST2025-02-13T14:35:15+5:302025-02-13T14:36:01+5:30

आता रणवीरमुळे कपिल शर्माचाही जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

not only ranveer allahbadia but kapil sharma also did offensive joke on parents on national television | रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

आजकाल आक्षेपार्ह कॉमेडीवरुन वादंग उसळत आहे, कधी मुनव्वर फारुकी तर कधी आणखी कोणता कॉमेडियन अडचणीत सापडला. आता युट्यूब रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये केलेली आक्षेपार्ह कॉमेडी त्याच्या अंगाशी आली आहे. रणवीरने पालकांसंबंधी अभद्र जोक केला जो अनेकांना रुचलेला नाही. पण तुम्हाला माहितीये का याआधील कपिल शर्मानेही (Kapil Sharma)  पालकांवर आक्षेपार्ह जोक केला होता. आता रणवीरमुळे कपिल शर्माचाही जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कॉमेडियन कपिल शर्माने त्याच्या 'कॉमेडी नाईट्स' शोमध्ये एपिसोडच्या सुरुवातीलाच आक्षेपार्ह जोक केला होता. तो म्हणतो, "आजकालची मुलं रात्री अपरात्री अभ्यासासाठी उठत नाहीत, पण क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी नक्कीच उठतात. ही मुलं क्रिकेटचे एवढे चाहते असतात की ४ ची मॅच पाहण्यासाठी मध्यरात्री २ वाजताही उठतात. मग आईवडिलांची कबड्डी पाहून झोपतात."

कपिलचा हा आईवडिलांची कब्बडी जोक आता पुन्हा व्हायरल होतोय. कपिलने अप्रत्यक्षरित्या केलेला हा जोक आक्षेपार्हच आहे. अनेकांनी कमेंटमध्ये त्यावर आक्षेपही घेतला आहे. तसंच एपिसोडमध्येही समोर बसलेले प्रेक्षक शॉक झालेले दिसत आहेत. रणवीर अलाहाबादिया प्रकरणात कपिलचा हा व्हिडिओही आता सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: not only ranveer allahbadia but kapil sharma also did offensive joke on parents on national television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.