'नवराई माझी लाडाची...' निवेदिता सराफ यांचा परदेशात डान्स; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 13:58 IST2023-07-06T13:58:36+5:302023-07-06T13:58:48+5:30

'व्हॅक्युम क्लीनर' या नाटकात त्या सध्या काम करत आहेत.

nivedita saraf dancing on navrai majhi ladachi song video viral on internet | 'नवराई माझी लाडाची...' निवेदिता सराफ यांचा परदेशात डान्स; Video व्हायरल

'नवराई माझी लाडाची...' निवेदिता सराफ यांचा परदेशात डान्स; Video व्हायरल

मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ  (Nivedita Saraf) यांच्याकडे बघितलं तर वय काय असतं असा प्रश्न पडेल. त्यांचा उत्साह तरुणींनाही लाजवणारा आहे. निवेदिता सध्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासोबत परदेशात गेल्या आहेत. 'व्हॅक्युम क्लीनर' या नाटकात त्या सध्या काम करत आहेत. नाटकाच्या प्रयोगासाठीच त्या परदेश दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हिरवा शर्ट आणि स्किन रंगाच्या पँटमध्ये निवेदिता सराफ अगदी फिट दिसत आहेत. सोबत असणाऱ्या काही महिसांसोबत त्यांनी 'नवराई माझी लाडाची' या गाण्यावर त्या डान्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकताच त्यांच्या व्हॅक्युम क्लीनर नाटकाचा ऑस्ट्रेलिया येथे प्रयोग झाला.

निवेदिता यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.'आमची अप्सरा सुंदर दिसत आहे' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. निवेदिता आणि अशोक सराफ यांची जोडी आजही प्रेक्षकांना भावते. इतक्या वर्षांपासून दोघेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांचा वाढदिवस जोरदार साजरा झाला. सध्या दोघंही परदेशात फिरण्याचा आनंद घेत आहेत.

Web Title: nivedita saraf dancing on navrai majhi ladachi song video viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.