'वहिनीसाहेब सुपरस्टार', निलेश साबळेचा नवा शो, चाहते म्हणाले- "चला हवा येऊ द्या..."
By कोमल खांबे | Updated: October 28, 2025 13:07 IST2025-10-28T13:07:07+5:302025-10-28T13:07:30+5:30
निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली. त्यानंतर आता निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' हा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

'वहिनीसाहेब सुपरस्टार', निलेश साबळेचा नवा शो, चाहते म्हणाले- "चला हवा येऊ द्या..."
'चला हवा येऊ द्या' या शोची ओळख बनलेला निलेश साबळे नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "हसताय ना? हसायलाच पाहिजे..." असं म्हणत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली. त्यानंतर आता निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' हा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
निलेश साबळेने त्याच्या सोशल मीडियावरुन 'वहिनीसाहेब सुपरस्टार' या नव्या शोची घोषणा केली आहे. "महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो…धमाल खेळ, गप्पा , कॉमेडी, संगीत , बक्षिसे आणि बरंच काही", असं कॅप्शन त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिलं आहे. निलेश साबळेच्या या शोमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. त्यावर संपर्क करत इच्छुकांना या शोमध्ये सहभागी होता येईल.
'वहिनीसाहेब सुपरस्टार'ची घोषणा केल्यानंतर निलेश साबळेला चाहत्यांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकांनी निलेश साबळेला चला हवा येऊ द्यामध्ये परत येण्याची इच्छा कमेंटमध्ये बोलून दाखवली आहे. तर काहींनी या शोची तुलना आदेश बांदेकरांच्या 'होम मिनिस्टर'शी केली आहे. निलेश साबळेने काही वेळासाठी 'होम मिनिस्टर' या शोचं सूत्रसंचालनदेखील केलं होतं. निलेश साबळेच्या या नव्या शोसाठी चाहते उत्सुक आहेत. पण हा शो कोणत्या वाहिनीवर येणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.