मालिकेत होणार लहानग्या इंद्राची एन्ट्री; 'मन उडू उडू झालं'मध्ये येणार रंजक वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:52 IST2022-06-24T17:51:50+5:302022-06-24T17:52:13+5:30
Man udu udu zal: या लहानग्या इंद्राच्या माध्यमातून मोठ्या इंद्राचं बालपण मालिकेत दाखवलं जाणार आहे.

मालिकेत होणार लहानग्या इंद्राची एन्ट्री; 'मन उडू उडू झालं'मध्ये येणार रंजक वळण
'मन उडू उडू झालं' (man udu udu zal) ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. इंद्राचं सत्य देशपांडे सरांसमोर आल्यामुळे त्यांनी दिपू आणि इंद्राच्या लग्नाला नकार दिला आहे. इतकंच नाही तर दोघांच्या भेटीवरही बंधन घातली आहेत. इंद्र गुंड असल्याचं म्हणत देशपांडे सरांनी त्याच्याशी असलेले सगळं संबंध तोडू टाकले. यामध्येच आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्रामुळे मालिकेचं संपूर्ण कथानक बदलणार आहे.
इंद्राचं सत्य समोर आल्यानंतर तो वारंवार देशपांडे सरांसमोर त्याची बाजू मांडायचा प्रयत्न करत होता. मात्र, सरांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. यामध्येच आता इंद्रा गुंडगिरी मार्गाला लागण्यामागील कारण सांगण्यासाठी या मालिकेत एका बालकलाकाराची एन्ट्री होणार आहे. या लहानग्या इंद्राच्या माध्यमातून मोठ्या इंद्राचं बालपण मालिकेत दाखवलं जाणार आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या मालिकेचं एक पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका बालकाराची एन्ट्री होणार असल्याचं दिसून येत आहे. हा चिमुकला बालपणीच्या इंद्राची भूमिका साकारणार आहे. सध्या लहान इंद्राची भूमिका नेमकी कोणता बालकलाकार साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्याच्या येण्यामुळे मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळतं.