नेहा कक्करने सांगितले आदित्य नारायणच्या लग्नाविषयी, वाचा कधी करणार आदित्य लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 17:23 IST2020-02-22T14:29:05+5:302020-02-22T17:23:56+5:30
आदित्य नारायण कधी लग्न करतोय हे नेहाने इंडियन आयडल 13 या कार्यक्रमात सांगितले.

नेहा कक्करने सांगितले आदित्य नारायणच्या लग्नाविषयी, वाचा कधी करणार आदित्य लग्न
बॉलिवूडची सुपरस्टार सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा होती. इंडियन आयडल 11 च्या सेटवर नेहा-आदित्यचे कुटुंबीय एकमेकांना भेटले, लग्नाची बोलणी झाली, तारीखही ठरली. पण हे लग्न होणार त्याचपूर्वी असे काहीही नसल्याची बातमी आली की, चाहत्यांची निराशा झाली.
इंडियन आयडल 11 मध्ये नेहा कक्कर आणि आदित्य नारायण एकमेकांना वरमाला घालताना दिसले. सप्तपदीचीही तयारी देखील दिसली. बाजूला इंडियन आयडलचे स्पर्धक आणि अन्य जजेसही उभे होते. अर्थात हे लग्न इंडियन आयडल 11 या शोचा एक भाग होता. आता इंडियन आयडलचा फिनाले लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमात बद्री की दुल्हनिया या गाण्यावर आदित्य आणि नेहा परफॉर्म करताना दिसणार आहेत.
या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात इंडियन आयडलविषयी नेहा तिच्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे. तिने सांगितले की, इंडियन आयडल सीझन 11 हा एक अद्भुत प्रवास होता आणि विशाल ददलानी सर आणि हिमेश रेशमिया सर यांच्यासारख्या दिग्गजांसह मला स्टेज शेअर करायला मिळाला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी शोमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीस कॅमेरासमोर असलेल्या लोकांपासून ते त्यामागे असलेल्या सर्वांचे आभार मानण्याची ही संधी घेऊ इच्छितो. विशाल सर मला भावासारखे आहेत आणि हिमेश सर वडिलांप्रमाणे नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात. या शोच्या संपूर्ण प्रवासात या लोकांनी मला नेहमीच साथ दिली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी हे देखील सांगू इच्छितो की, आदित्य एक अतिशय सुंदर व्यक्ती आहे. आणि या वर्षी माझ्या या प्रिय मित्राचे लग्न होत आहे. माझ्या शुभेच्छा नेहमीच त्याच्यासोबत असतील.”