नीरज करणार निशीला प्रपोज; काय असेल दादा खोतांच्या लेकीचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 15:53 IST2023-12-27T15:52:46+5:302023-12-27T15:53:17+5:30
sara kahi tichasathi: निशी सुद्धा देणार तिच्या प्रेमाची कबुली?

नीरज करणार निशीला प्रपोज; काय असेल दादा खोतांच्या लेकीचं उत्तर
छोट्या पडद्यावर सध्या सारं काही तिच्यासाठी ही मालिका चांगलीच गाजत आहे. आतापर्यंत दादांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या निशीने पहिल्यांदाच कोकणाबाहेर पाऊल टाकलं आहे. नीरजच्या साथीने तिने मुंबई गाठली आहे. बॅटमिंटन खेळासाठी घराबाहेर पडलेल्या निशीला नीरज मुंबईच्या या मायानगरीत सातत्याने साथ देत आहे. तिला सांभाळून घेत आहे. परंतु, एकमेकांचे मित्र असलेली ही जोडी लवकरच प्रेमात पडणार असल्याचं दिसून येत आहे.
निशीसोबत राहून, तिला बॅटमिंटन शिकवता शिकवता नीरज हळूहळू तिच्या प्रेमात पडू लागला आहे. इतकंच नाही तर आता पहिल्यांदाच तो त्याच्या मनातल्या भावना निशीसमोर व्यक्त करणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नीरज निशीला प्रपोज करताना दिसत आहे. त्यामुळे लवकरच या मालिकेत आता लव्हट्रॅक सुरु होणार असल्याचं दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये नीरज, निशीला प्रपोज करतो. मात्र, अचानकपणे नीरजने केलेल्या प्रपोजमुळे निशी गडबडून जाते. त्याला नेमकं काय उत्तर द्यावं हे तिला कळत नाही. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर टेन्शन, मनात धाकधूक सारं काही दिसून
येतं.
दरम्यान, नीरजने निशीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. पण, त्याच्या प्रपोजला निशी काय उत्तर देईल? निशी सुद्धा तिच्या प्रेमाची कबुली देईल का?दादा खोतांना याविषयी कळलं तर काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.