मराठी अभिनेत्याने मातीपासून घडवली बाप्पाची मूर्ती, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:10 IST2024-09-04T15:10:02+5:302024-09-04T15:10:29+5:30
Ganesh Chaturthi 2024 : दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने गणेश मूर्ती घडवतात. अशाच एका मराठी कलाकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.

मराठी अभिनेत्याने मातीपासून घडवली बाप्पाची मूर्ती, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
यंदाचा गणेशोत्सव काही दिवसांवर आहे. अवघ्या तीन दिवसांतच घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग असून बाजारपेठाही सजल्या आहेत. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने गणेश मूर्ती घडवतात. अशाच एका मराठी कलाकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.
मालिकांमध्ये या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्याचं दाखविण्यात येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील' नवरी मिळे हिटलरला' ही गाजलेली मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतही गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. जहागीरदारांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. यासाठी स्वत: एजे त्याच्या हाताने गणरायाची मूर्ती बनवत आहे. याचा व्हिडिओ सेलिब्रिटी प्रमोटर्स या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये एजेची भूमिका साकारणारा अभिनेता राकेश बापट मातीपासून गणपतीची मूर्ती घडवताना दिसत आहे. राकेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ही कलाकुसर पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत अभिनेता राकेश बापट हा AJ ची अर्थात अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारत आहे. तर राकेशसह या मालिकेत अभिनेत्री वल्लारी विराज प्रमुख भूमिकेत आहे. वल्लरी लीलाची भूमिका साकारत आहे. शर्मिला शिंदे, भुमीजा पाटील आणि सानिका काशीकर या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.