'नवरी मिळे हिटलरला' मालिकेची वर्षपूर्ती! अभिनेत्री वल्लरी विराजची खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:47 IST2025-03-18T17:46:26+5:302025-03-18T17:47:00+5:30

छोट्या पडद्यावरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे.

navari mile hitlerla serial completed one year actress vallari viraj shared special post | 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेची वर्षपूर्ती! अभिनेत्री वल्लरी विराजची खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेची वर्षपूर्ती! अभिनेत्री वल्लरी विराजची खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

Vallari Viraj Post: छोट्या पडद्यावरील 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlarla)  ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट अभिराम उर्फ एजेची भूमिका साकारतो आहे. तर अभिनेत्री वल्लरी विराज 'लीला' च्या भूमिकेत दिसते आहे. मालिकेतील एजे आणि लीलीच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. सध्या मालिकेत मालिकेत एजे आणि लीलाचं नातं बहरत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. गेल्यावर्षी १८ मार्चपासून 'नवरी मिळे हिटलरला' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. आज या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने अभिनेत्री वल्लरी विराजने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 


वल्लरी विराजने मालिकेची वर्षपूर्ती होताच इन्स्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरील काही अनसीन फोटो शेअर करत सुंदर शब्दात लिहिलंय, "एक वर्ष मेहनतीचे, एक वर्ष हास्याचे आणि एक वर्ष या सुंदर प्रवासाचे...".

पुढे वल्लरीने म्हटलंय, "या एका वर्षात मला आणि माझ्या टीमला मिळालेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. हा शब्द त्यापुढे फारच छोटा आहे. यापुढेही आम्ही आमचे सर्वोत्तम देत राहू. यासाठी मी माझ्या टीमचे, प्रेक्षकांचे, मित्रांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई बाबांचे मला माझे आभार मानते. कारण या सगळ्यामागे त्यांचीच प्रेरणा आहे."

दरम्यान, 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका झी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार रोज रात्री १० वाजता प्रसारित होते. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. 

Web Title: navari mile hitlerla serial completed one year actress vallari viraj shared special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.