'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील वर्षाचा पती आहे मराठी कलाविश्वातील दिग्दर्शक, जाणून घ्या त्याच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:00 AM2022-09-14T07:00:00+5:302022-09-14T07:00:07+5:30

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं.

Nava Gadi Nava Rajya fame kirti Pendharkar husband is also director in the Marathi industy | 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील वर्षाचा पती आहे मराठी कलाविश्वातील दिग्दर्शक, जाणून घ्या त्याच्याबद्दल

'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील वर्षाचा पती आहे मराठी कलाविश्वातील दिग्दर्शक, जाणून घ्या त्याच्याबद्दल

googlenewsNext

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्री किर्ती पेंढारकरचा पतीदेखील प्रसिद्ध चेहरा आहे. 

अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक जोडी आहे किर्ती पेंढारकरचा आणि त्याच्या पतीची. किर्ती सध्या झी मराठी वाहिनीवर नवा गडी नवं राज्य ही मालिकेत दिसतेय. मालिकेत वर्षा ही भूमिका साकारताना दिसते आहे. कीर्ती पेंढारकर हिने ललित २०५ या मालिकेतून महत्वाची भूमिका साकारली होती. चोरीचा मामला हा किर्तीने अभिनित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटात किर्तीने आशाचे पात्र साकारले होते. तिच्या या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

कीर्तीचा पती आकाश पेंढारकर हा देखील याच क्षेत्रात कार्यरत आहे. दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, व्हिडीओ एडिटर आणि मीडिया मध्यमातून तो कार्यरत आहे. श्रेयस तळपदेच्या आपडी थापडी या चित्रपटाच्या मार्केटिंगची धुरा कीर्ती आणि आकाश पेंढारकर या दोघांनीही सांभाळली आहे. किर्ती अनेकवेळा आकाशसोबतचे फोटो शेअर करत असते. 

 

Web Title: Nava Gadi Nava Rajya fame kirti Pendharkar husband is also director in the Marathi industy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.