लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 08:58 IST2023-03-17T08:56:52+5:302023-03-17T08:58:41+5:30

नम्रताने लेकाच्या वाढदिवशी शुभेच्छारुपी एक खास पोस्ट लिहिली आहे जी वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

namrata sambherao marathi actress shared emotional post for son rudraraj on his birthday | लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...'

लॉलीने रडवलं! 'हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावची मुलासाठी भावूक पोस्ट, म्हणाली, 'अपराधी भावना...'

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao). ती तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिचे चाहते महाराष्ट्राच्या घराघरात आहेत. ती कधी लॉली  बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साधी आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. नम्रता सोशल मीडियावर सक्रीय असून तिथे शेअर केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत येत असते. नम्रताने नुकतीच तिच्या छोट्या मुलाच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छारुपी एक खास पोस्ट लिहिली आहे जी वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

घरी लहान मुलाला सोडून कामावर जाणाऱ्या महिलेची कशी घालमेल होत असेल आणि चते लेकरु आई आवाज देत आपल्या आईला कसं थांबवत असेल हे नम्रताने या कॅप्शनमधून मांडलं आहे.  

ती लिहिते, 'आज आमच्या बाळाचा वाढदिवस. आम्ही दोघांनी ठरवलं थोडं जगून घेऊया थोडा वेळ जाऊदे मग चान्स घेऊया,
जगलो हसलो रडलो भांडलो आता जरा आई बाप व्हायचा स्टान्स घेऊया,
वाटलं एखादं लेकरू असावं
ज्याला कडेवर घेऊन मिरवावं
त्याने आई म्हणत उराशी बिलगावं...!

एक मात्र मला कळून चुकलं, तुम्ही लेकरं आमच्या इच्छेनुसार नाही तर तुमच्या इच्छेनुसार आयुष्यात येता
आणि आम्हा आई बापाच्या जगण्याला खरा अर्थ देता 

आणि मग स्वप्न आमचं पूर्ण झालं,
उदरी माझ्या लेकरू आलं ..
त्याच्या येण्याने एक आवर्तन पूर्ण झालं
पूर्वी वाटायचं हा मला जीव लावेल का
मी कामावर गेले कि माझ्या मागे धावेल का
पण माझ्या शिवाय त्याच आता पान हलत नाही …
मी कामाला गेले कि तुझ्याविना माझं मन रमत नाही …
कधी कधी मनात खूप अपराधी भावना येते
पण हे सगळं प्रत्येक आई आपल्या बाळा साठी च तर करते
प्रत्येक वेळी त्याच्या आई ह्या हाकेने माझा उर भरून येतो
आई अंगाई म्हण ना ह्या वाक्याने कंठ माझा दाटून येतो
आई मी तुझ्या कुशीत झोपू म्हणजे मला झोप लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र माझी झोप उडते
मग त्याच्या कुशीत जाऊन कधी कधी मी एकटीच रडते
त्याच हसणं बघितलं कि आयुष्य माझं वाढतं
आणि एका गोड बाळाची आई म्हणून थोडं मूठभर मांस देखील चढतं

नम्रताची इन्स्टाग्राम पोस्ट https://www.instagram.com/p/Cp1ugoFJ2MU/

प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणाऱ्या नम्रताने या पोस्टमधून सर्वंना भावूक केले आहे. रडायला भाग पाडले आहे. आई आणि लेकराचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि न सोसणारा विरह तिने अप्रतिम शब्दात मांडला आहे. नम्रताच्या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. 

Web Title: namrata sambherao marathi actress shared emotional post for son rudraraj on his birthday