टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:37 IST2026-01-23T18:34:14+5:302026-01-23T18:37:04+5:30
'मुरांबा' मालिकेतील 'या' लोकप्रिय अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची मांदियाळी
Siddharth Khird Wedding: सध्या मराठी कलाविश्वामध्ये लगीनसराई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांमध्ये मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.आता यामध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धार्थ खिरीड आहे. नुकताच सिद्धार्थचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अभिनेत्याच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

'फ्रेशर्स','मुलगी झाली हो','राणी मी होणार' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता सिद्धार्थ खिरीड महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाला. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा हा नायक आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकला आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, इतकंच नाही तर गर्लफ्रेंडला गोव्याच्या समुद्रकिनारी फिल्मी स्टाईलने प्रपोज केलं होतं. यानंतर सिद्धार्थ कधी लग्न करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती. अखेर अभिनेत्याने त्याची प्रेयसी डॉ. मैथिली भोसेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.
दरम्यान, सिद्धार्थने लग्नात गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर त्याची पत्नी मैथिली नऊवारी साडीमध्ये पारंपरिक अंदाजात पाहायला मिळतेय. दोघंही लग्नात खूपच गोड दिसत आहेत. सध्या या जोडप्यावर कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या लग्नात अभिनेत्री गौरी किरण, अमृता देशमुख, सृजन देशपांडे, प्रसाद जवादे, रश्मी अनपट या कलाकारांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली.
सिद्धार्थच्या पत्नीचं नाव डॉ. मैथिली भोसेकर आहे. मैथिली कॅनडात राहते. शिवाय मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट-२०२२-२३ चा खिताब तिने पटकवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात. अशातच नुकताच सिद्धार्थ आणि मैथिलीचा लग्न सोहळा पार पडला आहे.