दिव्या पुगावकरच्या संगीत सोहळ्यात 'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकारांची धमाल, पाहा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 14:08 IST2025-02-16T14:04:31+5:302025-02-16T14:08:33+5:30

'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर.

mulgi jhali ho serial starcast dance on actress divya pugaonkar sangeet ceremony video viral | दिव्या पुगावकरच्या संगीत सोहळ्यात 'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकारांची धमाल, पाहा व्हिडीओ 

दिव्या पुगावकरच्या संगीत सोहळ्यात 'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकारांची धमाल, पाहा व्हिडीओ 

Divya Pugaonkar Sangeet Ceremony: 'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. दिव्या पुगावकर सध्याा झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत काम करताना दिसते आहे. परंतु अलिकडे अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे लवकरच दिव्या लग्नबंधनात अडकणार आहे. दिव्या पुगावकर अक्षय घरतसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा त्यानंतर हळदीचा कार्यक्रम पार पडला. आता अभिनेत्रीच्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.


दिव्याची लगीनघटिका समीप आली आहे. सध्या दिव्याच्या घरी लग्नाआधीचे विधी पार पडत आहेत. केळवण, हळद, मेहंदी पार पडल्यावर नुकताच या दोघांचा संगीत सोहळा पार पडला. मराठी कलाविश्वातील कलाकार आणि या जोडप्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होतीनुकतेच सोशल मीडियावर दिव्याच्या संगीत सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या कार्यक्रमात मुलगी झाली हो मालिकेतील कलाकार आणि दिव्या यांनी जबरदस्त डान्स केला आहे.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी शर्वणी पिल्लई, सिद्धार्थ खिरीड तसेच स्नेहलता, सृजन देशपांडे यांनी मिळून जबरदस्त एनर्जीसह मुलगी झाली हो मालिकेच्या टायटल गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दिव्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही यात स्पष्ट दिसत आहे.

दिव्याने संगीत सोहळ्यात भरजरी डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. तर, त्यावर साजेसा मेकअप करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे. . दिव्याच्या संगीत सोहळ्याला मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. दरम्यान, दिव्याने तिच्या या संगीत सोहळ्यातचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना झलक दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

दरम्यान, दिव्या पुगावकर ही बऱ्याच कालावधीपासून अक्षय घरतसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता दोघंही आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. 

Web Title: mulgi jhali ho serial starcast dance on actress divya pugaonkar sangeet ceremony video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.