'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- "यापुढे मी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:27 IST2025-02-25T15:23:20+5:302025-02-25T15:27:15+5:30

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी छोटासा तरीही महत्वाचा निर्णय घेतलाय (milind gawali)

milind gawali take important decision after aai kuthe kay karte goes off air | 'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- "यापुढे मी.."

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- "यापुढे मी.."

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) मालिकेत अनिरुद्धच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची पसंती मिळवलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. (milind gawali) मिलिंद यांनी 'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर एक छोटासा तरीही महत्वाचा निर्णय घेतलाय. मिलिंद गवळी सोशल मीडियावर लिहितात की, "अनेक वर्षापासून मला नेहमी हा प्रश्न पडत आलेला आहे कि एखाद्या कार्यक्रमात आपण कोणते कपडे घालायला हव्येत, बरं मला Indian आणि Western दोन्ही प्रकारच्या कपड्यांची सवय लहानपणापासूनच आहे."

"मी विद्याविहारला फातिमा हायस्कूलमध्ये चौथीपर्यंत होतो, ती कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियमची शाळा होती, मग पाचवी ते दहावी शारदाश्रम विद्यामंदिर इंग्रजी मिडीयम मध्ये होतो, शारदाश्रम ही इंग्रजी माध्यम असलं तरी बऱ्यापैकी मराठमोळी शाळा होती, पण दोन्ही शाळांमध्ये टाय tie घालणं compulsory होतं, त्यामुळे लहानपणापासून tie ची knot बांधायला शिकलो, कालांतराने tie ची Knot सहा-सात प्रकारे बांधता येते हेही शिकलो."

"घरी वडिलांना मी बहुतेक वेळा पोलीस वर्दीमध्येच पाहिलं, वर्दी ते अतिशय handsome दिसायचे, माझ्या आईला सुद्धा माझे वडील वर्दी मध्ये फार आवडायचे, आणि बरेच पोलिस अधिकारी घरून कामावर जाताना साध्या कपड्यांमध्ये जायचे आणि पोलीस स्टेशनला वर्दी घालायचे, पण माझी आई माझ्या वडिलांना वर्दी घालूनच पोलीस स्टेशनला जा असं सांगायची, त्यामुळे लहानपणापासूनच मला वर्दीचं पण एक वेगळा आकर्षण होतच, माझे दोन्ही आजोबा म्हणजे आईचे आणि वडिलांचे वडील धोतर आणि झब्बा घालायचे."


"माझ्या शाळेत हाफपॅन्ट शर्ट आणि टाय असा पेहराव असायचा, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर फुल पॅन्ट ती पण जीन्स, फुल बाह्यांचे टी-शर्ट, हे घालायला लागलो, कॉलेज संपून रेडिओला ट्रान्समिशन एक्झिक्यूटिव्ह ची नोकरी करायला लागलो , तेव्हा formal shirt and trouser , तीन महिन्यासाठी रसलखैमा Film City ला project director म्हणून गेलो होतो तेव्हा proper suit, blazer tie घालायचो, सिनेमात काम करायला लागला नंतर, सगळ्याच प्रकारचे कपडे घालावे लागले, प्रत्येक character ला त्याला शोभेल असे कपडे घालायचो."

"आई कुठे काय करते मध्ये corporate job असेपर्यंत blazers, घरामध्ये linen shirts linen trousers, लग्नकार्य सण चे scenes किंवा स्टार प्रवाह चे इव्हेंट्स, असले की फार भारी भारी कपडे दिले जायचे, आता "लग्नानंतर होईलच प्रेम" मध्ये मंत्री यशवंतराव भोसले या भूमिकेला बंडी कुर्ता आणि छानसा फेटा दिला गेला. आता मी सगळ्याच प्रकारचे कपडे वापरल्यामुळे मला स्वतःला कोणते कपडे वापरायचे हेच कळेनासं झालयं, थोडं over dress करायची पण मला सवय लागलीय. आता "साधी राहणी उच्च विचारसरणी" करण्याचा प्रयत्न करणार आहे. Indian Costume, भारतीय पेहराव करण्याचा प्रयत्न करणार आहे, बघूया किती जमतंय."

Web Title: milind gawali take important decision after aai kuthe kay karte goes off air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.