मेघन जाधवने दिली प्रेमाची कबुली, अशी सुरु झाली अनुष्का पिंपुटकरसोबत लव्हस्टोरी; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:20 IST2025-10-31T17:18:44+5:302025-10-31T17:20:34+5:30
पहिल्याच वर्षी घरी सांगितलं..., मेघन जाधव काय म्हणाला?

मेघन जाधवने दिली प्रेमाची कबुली, अशी सुरु झाली अनुष्का पिंपुटकरसोबत लव्हस्टोरी; म्हणाला...
'लक्ष्मी निवास' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता मेघन जाधव चर्चेत आला आहे. त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत तो काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता दोघांनी नातं जगजाहीर केलं आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासूनच दोघं एकमेकांच्या प्रेमात होते. नुकतंच मेघनने त्याची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली ते सांगितलं.
'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत मेघन जाधव म्हणाला, "रंग माझा वेगळा मालिकेवेळीच आमची छान मैत्री झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो. आम्ही असं प्रपोज वगैरे केलं नाही. दोघंही एकाच वेळी एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघंही एकमेकांचं काम पाहतो. एकमेकांना सपोर्ट करतो. दोघंही कामाबाबतीत खूप प्रामाणिक आहोत. आपलं काम कसं चांगलं होईल हेच पाहण्याचा आमचा प्रयत्न असतो. आता आमच्या रिलेशनशिपला अडीच वर्ष झाली. पहिल्या वर्षीच आमच्याबद्दल घरी सांगितलं होतं. घरी एकदा सांगितलं की सगळ्या गोष्टी सोप्या होतात."
लग्न कधी करणार?
मेघन म्हणाला, "लग्नाची तयारी सुरुच आहे. पण काम आधी त्यामुळे त्यावर जास्त लक्ष देतोय. घरचे लग्नाची तयारी करत आहेत त्यामुळे मी थोडा रिलॅक्स आहे. या नोव्हेंबर महिन्यातच आम्ही लग्न करणार आहोत."
मेघन सध्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंतची भूमिका साकारत आहे. विकृत माणसाची त्याची ही भूमिका आहे. तर अनुष्का पिंपुटकर 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करत आहे.
