परीचं सत्य येणार समोर; आजोबा नेहासह करतील का परीचा स्वीकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 17:19 IST2022-04-17T17:16:45+5:302022-04-17T17:19:45+5:30
Mazhi tuzi reshimgaath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यश, परीला घेऊन पॅलेसमध्ये येतो. मात्र, याचवेळी तिचं सत्य आजोबांना कळतं.

परीचं सत्य येणार समोर; आजोबा नेहासह करतील का परीचा स्वीकार?
छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ (mazhi tuzi reshimgaath) या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे आजोबा आणि नेहा यांच्यातील छान मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे आजोबा नेहाची प्रत्येक गोष्ट ऐकतात. तसंच नेहाने यशसोबत लग्न केल्यानंतर तिच या घराला घरपण देऊ शकेल हा विश्वासही त्यांना आहे. मात्र, नेहाला मुलीप्रमाणे मानणाऱ्या आजोबांना अद्यापही नेहा आणि परी यांच्यातील नातं माहित नाही. परंतु, आता हे सत्य आजोबांसमोर येणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यश, परीला घेऊन पॅलेसमध्ये येतो. मात्र, याचवेळी तिचं सत्य आजोबांना कळतं. परी ही नेहाचीच लेक असल्याचं त्यांना समजतं. त्यामुळे यापुढे ते कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
चाळीतली सगळी मुलं मामाच्या गावाला जातात. पण मला कुठेच जाता येत नाही असं म्हणून परी रुसून बसते. त्यामुळे तिची समजूत काढण्यासाठी यश तिला पॅलेसमध्ये घेऊन जातो. मात्र, पॅलेसमध्ये खेळत असताना परी अचानक आजोबांच्या रुममध्ये जाते. इतकंच नाही तर ती आजोबांसमोर नेहाला आई अशी हाक मारते. त्यामुळे या दोघींचं सत्य आजोबांसमोर येतं.
दरम्यान, परीने नेहाला आई अशी हाक मारल्यावर नेहा आणि यश टेन्शनमध्ये येतात. तर, आजोबांना पुन्हा एक नवा धक्का बसतो. परंतु, आता सत्य समोर आल्यानंतर आजोबा काय करतील? ते नेहाचा सून म्हणून स्वीकार करतील का? नेमकं काय होईल या मालिकेत? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, ही मालिका पाहिल्यावरच त्यांना या प्रश्नांची उत्तरं मिळतील.