VIDEO : माझी तुझी रेशीमगाठ: मोगऱ्याचं फुल हलतं कसं डुलुडुलु... शेफालीनं समीरसाठी घेतला भन्नाट उखाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 13:52 IST2022-07-03T13:49:40+5:302022-07-03T13:52:12+5:30
Mazhi Tuzhi Reshimgaath, Kitchen Kallakar : होय, ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर सर्वांनी मिळून समीर आणि शेफालीचं लग्न लावून दिलं. यानंतर दोघांनी एकमेकांसाठी भन्नाट उखाणा घेतला ते वेगळंच....

VIDEO : माझी तुझी रेशीमगाठ: मोगऱ्याचं फुल हलतं कसं डुलुडुलु... शेफालीनं समीरसाठी घेतला भन्नाट उखाणा
‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नुकतंच नेहा आणि यशचं लग्न पार पडलं. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या नेहा व यशचा रोमान्सही बघायला मिळाला. आता मात्र प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती शेफाली आणि समीरच्या लव्हस्टोरीत काय होतं, ते बघायची. अनेक प्रेक्षक शेफाली व समीरच्या ( Shefali Sameer ) लग्नाचीही प्रतीक्षा करत आहेत. तुम्ही यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, समीर आणि शेफालीचं लग्न लागलंय. अर्थात मालिकेत नाही तर ‘किचन कल्लाकार’च्या (Kitchen Kallakar) मंचावर. होय, ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर सर्वांनी मिळून समीर आणि शेफालीचं लग्न लावून दिलं. यानंतर दोघांनी एकमेकांसाठी भन्नाट उखाणा घेतला ते वेगळंच.
अलीकडे शेफाली अर्थात शेफालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate) , पुष्कर जोग (Pushkar Jog) आणि माधुरी पवार (Madhuri Pawar) हे सगळे ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर आलेत. मग काय धम्माल मज्जा मस्ती झाली. पाहुण्यांचा उत्साह इतका दांडगा की, त्यांनी थेट समीर आणि शेफालीचं लग्न लावून दिलं. अगदी गळ्यात वरमाला घालण्यापासून तर उखाणा घेण्यापर्यंतचा कार्यक्रम रंगला.
समीरची भूमिका साकारणारा संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने शेफालीसाठी मस्त उखाणा घेतला. ‘तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामुळे माझ्यावर ही काय वेळ आली, मनात होती नेहासारखी कुणी, नशीबी आली शेफाली...,’ असा त्याचा उखाणा ऐकून ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर हास्याचे कारंजे उडाले.
शेफालीनं तर यापेक्षा भन्नाट उखाणा घेतला. ‘मोगऱ्याचं फुल हलतं कसं डुलुडुलु, समीरराव आमचे डुकराचं पिलू...,’ असा तिचा उखाणा ऐकून सगळ्यांचं हसूहसू पोट दुखलं.
समीरच्याची लग्नाची वरातही भारी होती. लहान मुलांच्या खेळण्यातल्या बाईकवरून बसून त्याची वरात निघाली. हे सगळं बघताना पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना सुद्धा हसू अनावर झालं. अख्ख्या लग्नात समीरचा चेहरा पाहूनही सगळ्यांना हसू आवरेनासं झालं.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत आत्तापर्यंत यश आणि नेहाचा रोमॅन्टिक ट्रॅक पाहायला मिळाला. आता लवकरच समीर आणि शेफालीचा रोमँटिक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. नेहा आणि यशच्या लग्नात चोरून प्रेम करणाऱ्या या जोडप्याची लव्हस्टोरी पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत, हे नव्याने सांगायला नकोच.