‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:11 IST2023-10-13T12:10:08+5:302023-10-13T12:11:06+5:30
प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtrachi Hasya Jatra Show
टेन्शनवरची मात्रा अर्थात छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाचे अनेक सेलिब्रिटीही चाहते आहेत. या शोमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी खास पाहुणे म्हणून आले. आता या या प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे.
हास्यजत्रेतील कलाकरांचा कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये गणेश आचार्य यांच्यासोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, नम्रता संभेराव, ऋतुजा बागवे, चेतना भट यांच्यासह गणेश आचार्य 'झुमका' या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून प्रेक्षकांनी लाइक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि या जत्रेतून भेटणारी कोहली फॅमिली.. लॉली.. सावत्या.. गौऱ्या आणि असे बरेच प्रतिभावंत कल्लाकार आज आपल्याही घरातील एक सदस्यच झाले आहेत.