‘मॉम’ चित्रपटातील नवाझुद्दिनच्या लूकमागे मार्क ट्रॉय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 16:00 IST2018-06-29T15:52:28+5:302018-06-29T16:00:09+5:30

भारतीय प्रेक्षकांना प्रथमच इतके भीतीदायक प्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार असून त्यातील तांत्रिकच्या भूमिकेत स्वत: निर्भय वाधवा आहे.

Mark Troy with Nawazuddin's look in 'Mom' movie! | ‘मॉम’ चित्रपटातील नवाझुद्दिनच्या लूकमागे मार्क ट्रॉय!

‘मॉम’ चित्रपटातील नवाझुद्दिनच्या लूकमागे मार्क ट्रॉय!

‘स्टार प्लस’वर अलीकडेच प्रसारित होऊ लागलेल्या ‘कयामत की रात’ या नव्या भय थरार मालिकेबद्दल पहिल्या आठवड्यापासूनच तिच्याबद्दल अनुकूल अभिप्राय येत असल्याने निर्माते आनंदित झाले आहेत. भारतीय प्रेक्षकांना प्रथमच इतके भीतीदायक प्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार असून त्यातील तांत्रिकच्या भूमिकेत स्वत: निर्भय वाधवा आहे. मालिकेत निर्भय वाधवाच्या भीतीदायक तांत्रिकाचे रूप साकारण्यासाठी निर्मात्यांनी मार्क ट्रॉय या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या वेशभूषाकाराला करारबध्द केले होते. ‘मॉम’ चित्रपटात नवाझुद्दिन सिद्दिकीला दिलेला खाजगी गुप्तहेराचा तसेच ‘राबता’ चित्रपटात राजकुमार रावचा लूक मार्कनेच तयार केला होता. निर्भयच्या चेहऱ्यावर या तांत्रिकाची वेशभूषा चढविण्यासाठी तब्बल दोन तास लागतात आणि त्याच्या चेहऱ्यावर ते सारे बसविल्यावर त्याला ना काही खाता येते ना पाणी पिता येते.

या तांत्रिकाच्या वेशभूषेबद्दल निर्भय म्हणाला, “कयामत की रात मालिकेतील माझी तांत्रिकाची वेशभूषा स्वत: मार्क ट्रॉय यानेच तयार केली आहे. मार्कने आतापर्यंत या क्षेत्रात अनेक नावाजलेले लूक विकसित केले असून आता या मालिकेसाठी मला त्याच्याकडून असा लूक लाभण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. अशा गोष्टींमुळे अभिनेत्यांच्या कठोर परिश्रमांचं चीज तर होतंच, पण संबंधित मालिकाही लोकप्रिय होते.”

Web Title: Mark Troy with Nawazuddin's look in 'Mom' movie!