Bigg Boss Marathi 3, Episodes, 05 Dec :'मी तुझ्यावर भार नव्हते'; विशालच्या 'त्या' निर्णयामुळे दुखावली सोनाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:55 IST2021-12-05T16:54:06+5:302021-12-05T16:55:39+5:30
Bigg Boss Marathi 3: या शोमध्ये सहभागी झालेले अनेक स्पर्धक पहिल्या दिवसापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकत गेला त्यांच्यात वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळालं.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 05 Dec :'मी तुझ्यावर भार नव्हते'; विशालच्या 'त्या' निर्णयामुळे दुखावली सोनाली
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून कायम बिग बॉस मराठीची चर्चा रंगत असते. सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून विविध कारणांमुळे ते चर्चेत येत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले अनेक स्पर्धक पहिल्या दिवसापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, जसजसा हा शो पुढे सरकत गेला त्यांच्यात वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातलीच एक जोडी म्हणजे सोनाली पाटील आणि विशाल निकम. या दोघांची जोडी मध्यंतरी विविध कारणांमुळे चर्चेत आली होती. परंतु, आता दोघांमध्ये कमालीचे वाद होताना दिसून येत आहे. अलिकडेच झालेल्या भागात सोनाली विशालमुळे दुखावली गेली आहे.
नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या चावडीवर विशालने केलेल्या एका कृतीमुळे सोनाली चांगलीच दुखावली आहे. विशेष म्हणजे त्या दोघांच्या इतक्या दिवसांच्या मैत्रीमध्ये आता कमालीची फूट पडली आहे. कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विशाल-सोनालीमधील वाद उघडउघड दिसून येत आहे.
या व्हिडीओमध्ये घरातील स्पर्धकांना एका टास्क देण्यात आला होता. यात असे कोणते स्पर्धक आहेत ज्यांना तुम्ही मदत केली पण ते तुमची मदत विसरले हे सांगायचं होतं.यावेळी विशालने एका वजनदार पोत्यावर सोनालीचा फोटो लावला. ज्यामुळे ती चांगलीच दुखावली आहे.
दरम्यान, मी तुझ्यावर कधीच भार नव्हते, असं सोनाली म्हणते. त्यावर मी कायम चांगलं करायला जातो पण तू वाकड्यात जाते. ती तुझी सवय आहे, असं म्हणत विशाल पुन्हा संतापतो. विशेष म्हणजे महेश मांजरेकरांसमोरच हे दोघं वाद घालायला लागतात. त्यामुळे आता बिग बॉसची चावडी संपल्यावर या दोघांचा वाद कोणत्या वळणावर जाणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं आहे.