Ti Parat Aaliye Update: उलगडणार 'ती'चं कोडं; सत्य लवकरच येणार समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 18:12 IST2021-12-13T18:11:41+5:302021-12-13T18:12:16+5:30
Ti Parat Aaliye:या मालिकेतील मुख्य पात्र ती म्हणजे नेमकं कोण? या प्रश्नाचं कोडं प्रेक्षकांना अद्यापही उलगडलेलं नाही.

Ti Parat Aaliye Update: उलगडणार 'ती'चं कोडं; सत्य लवकरच येणार समोर
छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'ती परत आलीये'(Ti Parat Aaliye). या मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या. भीती, उत्कंठा, साहस असे अनेक रस या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता आले. कॉलेजच्या मित्रांची मैत्री पाहता आली. परंतु, या मालिकेतील मुख्य पात्र ती म्हणजे नेमकं कोण? या प्रश्नाचं कोडं प्रेक्षकांना अद्यापही उलगडलेलं नाही. त्यामुळे मालिकेतील ही ती लवकर समोर यावी यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, आता या मालिकेतील तिचं कोडं उलगडलं आहे. लवकरची ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
अलिकडेच या मालिकेने १०० भागांचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे या १०० भागांच्या प्रवासात प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत गेली. त्यातच आता ही मालिका अत्यंत रंजक वळणावर पोहोचली असून ती म्हणजे नक्की कोण हे प्रेक्षकांना कळणार आहे.
दरम्यान, एकामागे एक चालू असलेल्या हत्येच्या मालिकेमागे नक्की ती आहे ki तो याच रहस्य उलगडणार असून संपूर्ण महाराष्ट्राला 'ती' कोण आहे? याच उत्तर मिळणार आहे. येत्या भागात या हत्यांमागचा खरा सूत्रधार समोर येणार आहे.