Video: अद्वैतचा जीव वाचवत नेत्रा करणार अस्तिकाचा अंत, विरोचकाला हा घाव पडणार महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:34 IST2024-04-10T15:34:01+5:302024-04-10T15:34:20+5:30
Satvya Mulichi Satavi Mulagi: अद्वैतला वाचवण्याच्या नादात नेत्राच्या हातून होणार अस्तिकाचा अंत

Video: अद्वैतचा जीव वाचवत नेत्रा करणार अस्तिकाचा अंत, विरोचकाला हा घाव पडणार महागात!
छोट्या पडद्यावर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरली आहे. सध्या या मालिकेत अस्तिका आणि विरोचका यांची एन्ट्री झाल्यामुळे ही मालिका चांगलीच रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. यामध्येच आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. अद्वैतचा जीव वाचवत असतांना नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत होणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अद्वैत बेसावध असतांना अस्तिका त्याच्यावर हल्ला करते. अस्तिकाने अद्वैतला जीवे मारायचा प्रयत्न करत असल्याचं नेत्रा पाहते आणि क्षणाचाही विलंब न करता ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र, या प्रयत्नात तिच्या हातून अस्तिकाचा अंत होतो.
दरम्यान, नेत्राने अस्तिकाचा अंत केल्यानंतर ती सर्प अवस्थेतील मृत अस्तिकाला रुपाली राजाध्यक्षासमोर घेऊन जाते ज्यामुळे विरोचका सुद्धा थक्क होते. आता अस्तिकाचा अंत झाल्यामुळे या मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार आहे. या सगळ्याचा परिणाम नेत्रा आणि अद्वैतवर काय होणार हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.