सहकुटुंब सहपरिवार: अंजी करणार दुसरं लग्न; 'हा' असेल तिचा होणारा नवरदेव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:47 IST2022-08-19T13:46:45+5:302022-08-19T13:47:10+5:30
Sahkutumb sahparivar: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पशासोबत संसार करणारी अंजी दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.

सहकुटुंब सहपरिवार: अंजी करणार दुसरं लग्न; 'हा' असेल तिचा होणारा नवरदेव
छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. आतापर्यंत या मालिकेत मोरे कुटुंबावर अनेक संकट आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्या संकटांवर संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे यशस्वीरित्या मात केली. अलिकडेच सूर्या मोठ्या आजारपणातून बरा झाला आहे. त्यामुळे मालिका एक रंजक ट्रॅकवर असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता अंजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं दिसून येतं.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पशासोबत संसार करणारी अंजी दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. त्यामुळे अंजी नेमकं कोणाशी आणि का लग्न करते हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, यामध्येही एक ट्विस्ट आहे. अंजी अन्य दुसऱ्या कोणासोबत नव्हे तर पशासोबतच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अंजी आणि पशा पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. पहिलं लग्न झाल्यावर अंजी आणि पशा यांचं फारसं पटत नव्हतं. मात्र, हळूहळू अंजीला पशाचा स्वभाव कळू लागला आणि ती त्याच्या प्रेमात पडली. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ही जोडी नव्याने त्यांच्या संसाराची सुरुवात करणार आहे. त्यामुळे या मालिकेत पुन्हा एक नवीन रंजकदार वळण येणार असल्याचं म्हटलं जातं.