नेहासोबत लग्न करण्यापूर्वी यशला द्यावी लागणार सत्वपरीक्षा; परी घेणार यशचा इंटरव्ह्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:41 IST2022-03-18T18:41:19+5:302022-03-18T18:41:44+5:30
Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये यश परीला त्याचं नेहावर प्रेम असल्याचं सांगतो.

नेहासोबत लग्न करण्यापूर्वी यशला द्यावी लागणार सत्वपरीक्षा; परी घेणार यशचा इंटरव्ह्यू
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांचं प्रेम खुलताना दिसत आहे. त्यामुळे सध्या मालिकेत लव्ह ट्रॅक सुरु आहे. परंतु, नेहा आणि यश यांचं लग्न होण्यापूर्वी त्यांना परीची परवानगी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे परीसमोर सत्य परिस्थिती सांगण्यासाठी, तिच्या मनाची समजूत घालण्यासाठी यश आणि नेहा प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता यश परीला नेहावर प्रेम असल्याचं सांगतो. मात्र, आता परीने त्याच्यासमोर एक अट ठेवली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माझं नेहावर आणि नेहाचं माझ्यावर प्रेम असल्याचं परीला सांगतो. त्यावर तुझा इंटरव्ह्यु घेतल्यानंतर मी ठरवेन की तुम्ही लग्न करायचं की नाही, असं परी सांगते. त्यामुळे नेहा आणि यशसमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, आता परी घेणाऱ्या मुलाखतीत ती यशला कोणते प्रश्न विचारणार? तिच्या प्रश्नांची यश योग्य उत्तरं देणार का? आणि, यश परीच्या परीक्षेत पास होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.