यशच्या घरात होणार नेहाचा गृहप्रवेश; पण शेफालीमुळे पुन्हा या जोडीत येणार दुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:23 IST2022-01-25T17:23:12+5:302022-01-25T17:23:48+5:30
Mazhi Tuzhi Reshimgaath: नेहा एकटी न येता तिच्यासोबत शेफालीलादेखील घेऊन येते. इतकंच नाही तर एकीकडे यश नेहाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, शेफाली त्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरते.

यशच्या घरात होणार नेहाचा गृहप्रवेश; पण शेफालीमुळे पुन्हा या जोडीत येणार दुरावा?
छोट्या पडद्यावरील तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'(Mazhi Tuzhi Reshimgaath). या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यातच सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. यशचं सत्य समोर आल्यानंतर नेहाने त्याच्याशी अबोला धरला आहे. त्यामुळे यश तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता शेफाली यशचे प्रयत्न पुन्हा फेल ठरवणार असल्याचं दिसून येत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये यश आणि समीर प्लॅन करुन नेहाला त्यांच्या घरी बोलावतात परंतु, नेहा एकटी न येता तिच्यासोबत शेफालीलादेखील घेऊन येते. इतकंच नाही तर एकीकडे यश नेहाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, शेफाली त्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरते.
यशच्या घरी कोणीही नसल्यामुळे समीर नेहाला जगन्नाथ चौधरी म्हणून फोन करतो.आणि, तिला घरी बोलावतो. तसंच आता घरात फक्त यश आणि नेहा तुम्ही दोघेच आहात त्यामुळे नेहाचं मन वळव असं समीर, यशला सांगतो. विशेष म्हणजे मोठ्या सरांचा फोन आल्यामुळे नेहा तडकाफडकी यशच्या घरी जायला निघते. मात्र, ती सोबत शेफालीलादेखील घेऊन जाते.
दरम्यान, यशच्या घरी पोहोचल्यावर शेफाली सतत यश आणि नेहाच्या मध्येमध्ये करते. त्यामुळे यशचा नेहासोबत बोलण्याचा एक प्रयत्न पुन्हा अयशस्वी ठरतांना दिसतोय. परंतु, आता या मालिकेत पुन्हा कोणती धमाल पाहायला मिळणार, शेफालीच्या लुडबुडीमुळे नेहा आणि यशची बट्टी होणार का? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.