Video: दिपूचं सत्य समजल्यावर इंद्राने घेतला मोठा निर्णय; दोघांच्या नात्यात येणार दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:33 IST2022-02-13T16:32:39+5:302022-02-13T16:33:44+5:30
Man udu udu zal: दिपूने एक मोठं सत्य इंद्रापासून लपवून ठेवलं होतं. हे सत्य आता इंद्रापुढे येणार आहे.

Video: दिपूचं सत्य समजल्यावर इंद्राने घेतला मोठा निर्णय; दोघांच्या नात्यात येणार दुरावा
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. अलिकडेच या मालिकेत दिपू आणि इंद्रा यांच्यातील प्रेम खुलत होतं. त्यामुळे ही मालिका अत्यंत रंजक वळणावर सुरु होती. परंतु, आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. दिपू देशपांडे सरांची मुलगी आहे हे सत्य इंद्राला समजणार आहे. त्यांमुळे आता या दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण होणार असल्याचं दिसून येत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा देशपांडे सरांना त्याच्या प्रेमाविषयी सांगायला जातो. त्याचं दिपूवर प्रेम असल्याचं तो सरांना सांगणार असतो. परंतु, दिपू सरांची मुलगी असल्याचं त्याला माहित नसतं. याच वेळी देशपांडे सर दिपूला बोलवतात आणि दिपू, देशपांडे सरांची मुलगी असल्याचं सत्य इंद्राला समजतं. त्यानंतर सत्य समजल्यामुळे इंद्रा पुरता हादरुन जातो.
दरम्यान, दिपू सरांची मुलगी असल्याचं समजल्यानंतर इंद्रा तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मी सत्य सांगणार होते. परंतु, तू लांब जाशील या भीतीमुळे मी सांगितलं नाही असं दिपू सांगते. मात्र, इंद्रा तिचं काहीही न ऐकता रस्त्यात तिला एकटीला सोडून निघून जातो. त्यामुळे आता या दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. परंतु, या मालिकेत पुढे काय घडणार हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना पुढील कोडं उलगडणार आहे.