बोहल्यावर चढणार डॉ. अजितकुमार; किरण गायकवाडने शेअर केला हळदीचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:15 PM2022-04-11T18:15:04+5:302022-04-11T18:15:29+5:30

Devmanus 2: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किरणला हळद लागल्याचं दिसून येत आहे.

marathi tv serial devmanus 2 dr ajit kumar haldi ceremony | बोहल्यावर चढणार डॉ. अजितकुमार; किरण गायकवाडने शेअर केला हळदीचा व्हिडीओ

बोहल्यावर चढणार डॉ. अजितकुमार; किरण गायकवाडने शेअर केला हळदीचा व्हिडीओ

googlenewsNext

'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडला ' देवमाणूस' या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. या मालिकेत डॉ. अजितकुमार ही भूमिका साकारुन त्याने त्याचा अल्पावधीत मोठा चाहतावर्ग निर्माण केला. या मालिकेला आणि किरणला मिळत असलेली लोकप्रियता पाहता या मालिकेचा दुसरा भाग 'देवमाणूस 2' देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या या मालिकेत अनेक रंजक वळणं येत असून डॉ. अजितकुमार आता बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला किरण कायम सेटवरील वा वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यामध्येच त्याने सध्या त्याच्या हळदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून किरण खरोखर लग्न करतोय की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

डॉक्टर अजितकुमारची रिअल लाइफ बहीणदेखील आहे अभिनेत्री; 'या' मालिकेत दोघांनी केलंय एकत्र काम

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किरणला हळद लागल्याचं दिसून येत आहे. मात्र, किरण प्रत्यक्षात बोहल्यावर चढणार नसून हा व्हिडीओ मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेत डॉ. अजितकुमारचं लग्न होणार आहे. त्यामुळे त्यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 
 

Web Title: marathi tv serial devmanus 2 dr ajit kumar haldi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.