Video: अरुंधती अन् आशुतोषमध्ये खुलतंय नवं नातं; दोघांमधील मैत्री पाहून अनिरुद्ध होतोय अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:17 IST2021-12-28T15:17:11+5:302021-12-28T15:17:46+5:30
Aai kuthe kay karte: आशुतोष आणि अरुंधती यांच्यात खुलत असलेली मैत्री अनिरुद्धच्या डोळ्यात चांगलीच खूपत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Video: अरुंधती अन् आशुतोषमध्ये खुलतंय नवं नातं; दोघांमधील मैत्री पाहून अनिरुद्ध होतोय अस्वस्थ
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे तिच्या लेकाचं अभिषेकचं लग्न होतंय. तर, कित्येक वर्षांनी तिचा कॉलेजचा मित्र तिला भेटला आहे. त्यामुळे अनिरुद्धने केलेल्या फसवणुकीच्या दु:खातून ती आता सावरताना दिसत आहे. यामध्येच तिला तिचे कुटुंबीय आणि मित्र आशुतोष मदत करताना दिसत आहेत. मात्र, आशुतोष आणि अरुंधती यांच्यात खुलत असलेली मैत्री अनिरुद्धच्या डोळ्यात चांगलीच खूपत असल्याचं पाहायला मिळत आहे.
स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिषेकच्या लग्नातील संगीत सोहळ्याचे काही क्षण दाखवण्यात आले आहेत. यामध्ये घरातील प्रत्येक जण स्टेजवर येऊन डान्स करताना दिसत आहे. यात खासकरुन आशुतोष आणि अरुंधती एकत्र डान्स करतात. जे पाहून अनिरुद्ध नाराज होतो. इतकंच नाही तर, संजना त्याला डान्स करण्याचा आग्रह करते. मात्र, तो तिला नकार देतो.
दरम्यान, अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील मैत्री अनिरुद्धला पहिल्यापासूनच खटकत आली आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा तो आशुतोषचा अपमान करायचा प्रयत्न करतो. तर, दुसरीकडे आशुतोषला कॉलेजमध्ये असल्यापासून अरुंधती आवडते. परंतु, सध्या तिच्या आयुष्यात सुरु असलेल्या घडामोडींमुळे तो केवळ तिचा एक चांगला मित्र म्हणून वावरत आहे.