'आशुतोष तुझी वाट बघतोय'; लग्नासाठी आप्पा करणार अरुंधतीची मनधरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 18:16 IST2022-04-14T18:15:52+5:302022-04-14T18:16:28+5:30
Aai kuthe kay karte: आप्पा सांगत असलेली गोष्ट अरुंधतीच्या मनाला फारशी पटत नसल्याने ती यावर उत्तर देणं टाळते.

'आशुतोष तुझी वाट बघतोय'; लग्नासाठी आप्पा करणार अरुंधतीची मनधरणी
'आई कुठे काय करते' या मालिकेत अलिकडेच घर सोडून गेलेले आप्पा पुन्हा देशमुखांच्या घरी परतले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांच्यातील आणि कांचनमधील मतभेद कमी झालेले नाहीत. यामध्येच अरुंधतीच्या घरी ते राहत असताना त्यांनी तिचा एकटेपणा पाहिला होता. म्हणूनच त्यांनी आशुतोषला तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली. त्याच्यानंतर आता ते अरुंधतीचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आप्पा अरुंधतीला आशुतोषसोबत लग्न कर असं सांगत आहेत. परंतु, आप्पा सांगत असलेली गोष्ट अरुंधतीच्या मनाला फारशी पटत नसल्याने ती यावर उत्तर देणं टाळते. मात्र, उतारवयात एकटेपण त्रासदायक ठरेल त्यामुळे आपल्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीचा हाताच हात धर असं ते तिला समजावतात.
दरम्यान, आप्पांनी अरुंधतीकडे लग्नाचा विषय काढल्यामुळे ती काही काळ स्तब्ध होते. विशेष म्हणजे आप्पा याविषयी आपल्याशी चर्चा करणार याची अरुंधतीला पूर्ण खात्री होती. कारण, आप्पा, आशुतोषला लग्नाविषयी सांगत असताना अरुंधतीने सगळं ऐकलं असतं. त्यामुळे आता अरुंधती खरंच आशुतोषसोबत लग्न करुन दुसरा संसार थाटेल का?