साक्षीच्या तालावर मणिराजने धरला ताल; कलाकारांचा ऑफस्क्रीन व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:58 IST2024-05-20T13:57:44+5:302024-05-20T13:58:23+5:30
Sakshi gandhi: या व्हिडीओमध्ये या जोडीने Raanjhan Aaya या ट्रेंडी गाण्यावर डान्स केला आहे.

साक्षीच्या तालावर मणिराजने धरला ताल; कलाकारांचा ऑफस्क्रीन व्हिडीओ व्हायरल
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी (SAKSHI GANDHI). या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळाली. साक्षी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. यात कधी ती तिच्या प्रोफेशनल वा कधी पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क अभिनेता मणिराज पवार याला तिच्या तालावर नाचवलं आहे.
राजा रानीची गं जोडी या मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता मणिराज पवार (maniraj pawar)सध्या सन मराठीवरील नवी जन्मेन मी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. त्यामुळे पडद्यावर एकमेकासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीनदेखील तितकीच छान केमिस्ट्री आहे. त्यामुळे बरेचदा ते एकमेकांसोबतचे भन्नाट रील शेअर करत असतात. यात साक्षीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये या जोडीने Raanjhan Aaya या ट्रेंडी गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. साक्षीने हा व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा एकदा मणिराजला मिन्नतवारी करावी लागल्याचंगही तिने म्हटलं आहे.
दरम्यान, #latepost (As usual यासाठी सुद्धा @manirajpawarofficial यांना convince केलेलं आहे.), असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. विशेष म्हणजे या पूर्वीही या जोडीने एका ट्रेडिंग गाण्यावर व्हिडीओ शेअर केला होता.