दादा कोंडकेंच्या गाण्यावर अविनाश नारकरांचा अफलातून डान्स; ऐश्वर्या नारकरांनीही दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 17:48 IST2024-02-07T17:48:16+5:302024-02-07T17:48:45+5:30
Aishwarya and avinash narkar: या जोडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दादा कोंडकेंच्या गाण्यावर अविनाश नारकरांचा अफलातून डान्स; ऐश्वर्या नारकरांनीही दिली साथ
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) आणि अविनाश नारकर (avinash narkar). कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे कोणताही नवा ट्रेंड आला की लगेचच ही जोडी तो फॉलो करते. त्यामुळे आजवर अनेक ट्रेंडिंग गाण्यावर, डायलॉग्सवर या जोडीने व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्येच सध्या त्यांचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. या जोडीने चक्क दादा कोंडकेंच्या गाण्यावर रील शेअर केलं आहे.
आजवर ऐश्वर्या आणि अविनाश या जोडीने अनेक हिंदी, मराठी गाण्यांवर व्हिडीओ तयार केले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्या-अविनाश यांनी दादा कोंडके यांच्या 'काशी गं काशी तुझी सवय कशी' या गाजलेल्या गाण्यावर रील केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी कमाल एक्स्प्रेशन्स दिले आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ क्षणार्थात व्हायरल झाला आहे.