"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 10:20 IST2025-05-03T10:18:49+5:302025-05-03T10:20:41+5:30
'कोण होतीस तू, काय झालीस तू' फेम अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात बांधलं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष

"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर
Sakshee Gandhi: 'सहकुटुंब सहपरिवार', नवी जन्मेन मी' यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री साक्षी गांधी घराघरात पोहोचली. निखळ सौंदर्य आणि सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. सध्या साक्षी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या मालिकेत ती यमुना धर्माधिकारी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेतील तिची भूमिका लक्षवेधी ठरत आहे. त्यात आता साक्षीने तिच्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
साक्षी गांधीने तिच्या गावी म्हणजेच चिपळूणला सुंदर असं घर टुमदार बांधलं आहे. "आणि घर झालं..."असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची पहिली झलक शेअर केली आहे. #गणपती बाप्पा मोरया! #नवीन घर… असं सांगत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साक्षीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिचं गावचं सुंदर असं टुमदार घर पाहायला मिळत आहे. . दारावरची आकर्षक नेमप्लेट, सफेद रंगाच्या थीममधील इंटेरिअर, नारळाची बाग आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं तिचं हे घर मन प्रसन्न करून जातं. तिच्या नव्या घरातील सजावटीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, साक्षी गांधीवर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. आकाश नलावडे, अश्विनी महांगडे, मधुरा जोशी, शर्वरी जोग, मंदार जाधव, अभिषेक रहालकर तसंच अनघा भगरे, गौरी कुलकर्णी या कलाकारांनी कमेंट्मध्ये अभिनेत्रीला या नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने यांनी "मनःपूर्वक अभिनंदन.... खूप खूप छान आहे तुमचं घरकुल...", अशी खास कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
वर्कफ्रंट
साक्षी गांधीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने वेगवेगवेगळ्या मालिकांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळतेय. या मालिकेमध्ये सुकन्या मोने, वैभव मांगले, मंदार जाधव, गिरीजा प्रभू अशी तगडी स्टारकास्ट आहे.