'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; सेलिब्रिटींकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:22 IST2025-07-04T11:19:35+5:302025-07-04T11:22:22+5:30
"स्वप्न पू्र्ण होताना...", मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी, किंमती वाचून थक्क व्हाल

'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; सेलिब्रिटींकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Yed lagla Premacha Actress Prajkta Navnale : यंदाच्या वर्षात मालिकाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी आपली स्वप्नपूर्ती केली आहे. अलिकडेच अभिनेते संजय नार्वेकर, गौरव मोरे, जान्हवी किल्लेकर तसेच यशोमन आपटे या कलाकारंनी नवीन गाडी घेतली. या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जाणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे 'येड लागलं प्रेमाचं' फेम प्राजक्ता नवनाळे (Prajakta Navnale) आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील राया-मंजिरी यांच्या जोडीसह प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. अशातच मालिकेत ऋजुताची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेने नवीन गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना नव्या गाडीची खास झलक दाखवली आहे. "गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ...! आई शप्पथ स्वप्नं पूर्ण होताना स्वतःच्या डोळ्यांनी बघण्यात मज्जाचं वेगळी आहे..", प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये प्राजक्ता तिच्या संपूर्ण कुटुंबासह गाडी खरेदी करायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच नवीन गाडी घेण्यापूर्वी सगळ्या कागदपत्रांवर सह्या करते, यानंतर पतीच्या साथीने नव्या गाडीची पूजा करते. तसेच पहिली गाडी खरेदी करण्यासाठी ती तिच्या आजीलाही सोबत घेऊन गेली.प्राजक्ता नवनाळेने Tata harrier ब्रँडची तब्बल १८ लाख किंमतीची गाडी खरेदी करून तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
वर्कफ्रंट
प्राजक्ता नवनाळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'जीव माझा गुंतला', 'मुलगी झाली हो', अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे. याशिवाय 'मंगलाष्टका रिटर्न्स', 'पीएसआय अर्जुन' अशा चित्रपटांमधून प्राजक्ताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.